नवी दिल्ली, 10 मार्च : दैनंदिन जीवनात इतर गरजांप्रमाणेच इंटरनेट
(Internet) हीदेखील एक महत्वाची गरज झाली आहे. आज बहुतांश कामं ऑनलाईन
(Online) करणं शक्य झाल्यानं इंटरनेट गरज अधोरेखित होते. स्मार्टफोन
(Smart Phones) असणं ही जशी गरज आहे, तसंच त्यासाठी डेटा असणं देखील आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेत देशातील एअरटेल
(Airtel), रिलायन्स जिओ
(Reliance Jio) तसंच व्होडाफोन आयडिया
(Vodafone Idea) सारख्या टेलिकॉम
(Telecom) कंपन्या कमीत कमी दरात डेटा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
रिलायन्स जिओचे डेटा पॅक (Reliance Jio Data Packs)
11 रुपयांचा डेटा व्हाऊचर
डिजीटने दिलेल्या वृत्तानुसार, जिओच्या 11 रुपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये युजर्सला 1 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे या व्हाऊचरची मुदत युजरकडे सद्यस्थितीत असलेल्या प्लॅनच्या मुदतीपर्यंत असते.
21 रुपयांचा डेटा व्हाऊचर
जिओच्या 21 रुपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये युजर्सला 2 जीबी डेटा मिळतो. या व्हाऊचरची मुदत देखील युजरकडे सद्यस्थितीत असलेल्या प्लॅनच्या मुदतीपर्यंत असते.
51 रुपयांचा डेटा व्हाऊचर
जिओच्या 51 रुपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये युजर्सला 6 जीबी डेटा मिळतो. या व्हाऊचरची मुदत युजरकडे सद्यस्थितीत असलेल्या प्लॅनच्या मुदतीपर्यंत असते.
101 रुपयांचा डेटा व्हाऊचर
जिओचा 101 रुपयांचा डेटा व्हाऊचर हा असा पॅक आहे की, ज्यामध्ये युजर्सला तब्बल 12 जीबी डेटा दिला केला जातो. या प्लॅनमध्येही अन्य डेटा पॅकप्रमाणेच मुदत दिली जात आहे.
201 रुपयांचा डेटा पॅक
जिओच्या 201 रुपयांच्या व्हाऊचरवर 40 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची मुदत 30 दिवस असते.
251 रुपयांचा डेटा व्हाऊचर
रिलायन्स जिओच्या 251 रुपयांच्या व्हाऊचरवर 50 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनचा अवधी 30 दिवस ठेवण्यात आला आहे.
151 रुपयांचे डेटा व्हाऊचर
जिओच्या 151 रुपयांच्या व्हाऊचरवर 30 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचा कालावधीदेखील 30 दिवस ठेवण्यात आला आहे.
वोडाफोन – आयडिया डेटा पॅक (Vodafone - Idea Data Packs)
VI 16 रुपयांचा डेटा व्हाऊचर
वोडाफोन – आयडीयाच्या 16 रुपयांच्या डेटा व्हाऊचरवर 1 जीबी डेटा मिळतो. परंतु याची वॅलिडिटी 24 तास इतकीच आहे.
48 रुपयांचा डेटा व्हाऊचर
वोडाफोन 48 रुपयांच्या डेटा पॅकवर 3जीबी डेटा मिळू शकतो. याची वॅलिडिटी 28 दिवस आहे.
98 रुपयांचे व्हाऊचर
वोडाफोन – आयडीया 98 रुपयांच्या व्हाऊचरवर 12 जीबी डेटा आफर करतो. या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवस आहे.
351 रुपयांत 100 जीबी डेटा
वोडाफोन – आयडीयाच्या 351 रुपयांच्या व्हाऊचरवर युजर्सला 100 जीबी डेटा मिळतो. याचा वापर युजर्सला 56 दिवसांपर्यंत करता येतो.
251 रुपये डेटा
वोडाफोन – आयडीयाच्या 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 50 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचा कालावधी 28 दिवस ठेवण्यात आलेला आहे.
(वाचा - 5G सारखा होईल तुमच्या 4G इंटरनेटचा स्पीड; फोनमध्ये करा हे बदल)
एअरटेल डेटा पॅक (Airtel Data Packs)
78 रुपयांचे डेटा पॅक
एअरटेलच्या डेटा पॅकची किंमत 78 असून या प्लॅनमध्ये युजरला 5 जीबी डेटा वापरण्यासाठी मिळतो. या प्लॅनची मुदत युजरकडे सद्यस्थितीत असलेल्या प्लॅनच्या मुदतीपर्यंत असते.
248 रुपयांचा डेटा व्हाऊचर
एअरटेलच्या 248 रुपयांच्या डेटा व्हाऊचरवर 25 जीबी डेटा मिळू शकतो. या प्लॅनची मुदतदेखील युजरकडे सद्यस्थितीत असलेल्या प्लॅनच्या मुदतीपर्यंत असते.
48 रुपयांचा डेटा व्हाऊचर
एअरटेलच्या 48 रुपयांच्या डेटा व्हाऊचरवर 3 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचा कालावधी 28 दिवस आहे.
401 रुपयांचा डेटा व्हाऊचर
401 रुपयांच्या डेटा व्हाऊचरवर 30 जीबी डेटा मिळू शकतो. या डेटाचा लाभ युजर्स 28 दिवसांपर्यंत घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.