नवी दिल्ली, 8 मे : एयरटेल
(Airtel) भारतात सर्वाधित युजर बेस असलेल्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी अनेक नवे प्लॅन्स लाँच करत असते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये अधिक वॅलिडिटी मिळणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल तर Airtel चे काही प्लॅन्स फायदेशीर ठरू शकतात. कंपनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकराचे प्लॅन देते. यात तुम्ही हवा तो प्लॅन निवडू शकता.
Airtel प्रीपेड रिचार्जमध्ये कंपनीकडे अनेक लाँग टर्म वॅलिडिटी प्लॅन्स आहेत. कंपनीच्या या प्लॅन्सची सुरुवातीची किंमत 1799 रुपयांपासून सुरू होते. या प्लॅनमध्ये युजर्सला एकूण 24GB डेटा मिळतो. त्याशिवाय अनलिमिटेड कॉल्स, आणि 3600 SMS ही मिळतात. या प्लॅनची वॅलिडिटी 365 दिवस इतकी आहे.
याशिवाय कंपनीचे दोन इतर लाँग टर्म प्लॅनही आहेत. हे दोनही प्लॅन डेली डेटा लिमिटसह येतात. कंपनी 2999 रुपयांत एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. त्याशिवाय 100 SMS ही मिळतात.
OTT -
या लिस्टमध्ये कंपनीचा सर्वात महागडा प्लॅन 3599 रुपयांचा आहे. या प्लॅनची वॅलिडिटी 365 दिवसांची आहे. यात युजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो. तसंच 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्सचाही पर्याय मिळतो. या प्लॅनमध्ये वरीलचा प्लॅनचाही फायदा मिळतो. दोन्ही प्लॅनमध्ये Disney+ Hotstar च्या सब्सक्रिप्शनचा फरक आहे.
एयरटेलच्या 3599 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन मिळतं. त्याशिवाय प्लॅन्समध्ये युजर्सला एक महिन्यासाठी Amazon Prime Video मोबाइल एडिशन ट्रायलही मिळतं. तसंच Wynk Music, Shaw Academy आणि फ्री हॅलो ट्यूनचाही फायदा मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.