मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सुपरस्टार Rajinikanth यांचं Social media app; Hoote मध्ये काय आहे खास?

सुपरस्टार Rajinikanth यांचं Social media app; Hoote मध्ये काय आहे खास?

रजनीकांत (Rajinikanth) यांनी Hoote अ‍ॅप लाँच केलं आहे.

रजनीकांत (Rajinikanth) यांनी Hoote अ‍ॅप लाँच केलं आहे.

रजनीकांत (Rajinikanth) यांनी Hoote अ‍ॅप लाँच केलं आहे.

    नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : आपल्या वेगळ्याच स्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांनी आता सोशल मीडिया क्षेत्रात एन्ट्री केली आहे. त्यांनी सोशल मीडिया अॅप लाँच केलं आहे  (Rajinikanth's Hoote app). या अ‍ॅपचं नाव Hoote असं आहे  (Hoote social media app). रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या विशगनने हे वॉइस बेस्ड सोशल मीडिया अ‍ॅप तयार केलं आहे. रजनीकांत यांनी सौंदर्यासाठी अ‍ॅपमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचं बोललं जात आहे. तसे बरेच सोशल मीडिया अ‍ॅप उपलब्ध असताना रजनीकांत यांच्या अ‍ॅपपमध्ये काय वेगळं आहे, असा प्रश्न पडतो. Drugs And Bollywood:ड्रग्ज चौकशीच्या भीतीने बॉलिवूडकर डिलीट करतायंतWhatsApp Chat Hoote अ‍ॅप हे व्हॉइस नोटवर आधारित अ‍ॅप आहे. या माध्यमातून युझर्सना टेक्स्ट नाही तर व्हॉइस मेसेज पाठवता येणार आहे. मेसेज टाईप करण्याऐवजी बोलून टाईप करावं लागेल. त्याचबरोबर त्यात युझर्सला संगीत आणि फोटोही टाकता येणार आहे. या App मध्ये एकूण आठ भाषांचा पर्याय देण्यात आला असून त्यात हिंदी, तमिळ, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि गुजराती याशिवाय काही विदेशी भाषांमध्येही हे अ‍ॅप असणार आहे. WhatsAppवर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? ग्रुप न बनवता करता येईल काम हे App लोकांसाठी अतिशय उपयोगी ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आता भारतीय बाजारात असे अनेक अ‍ॅप उपलब्ध असताना आता रजनीकांत यांनी लाँच केलेल्या या अ‍ॅपला लोकांची किती पसंती मिळती, याचीच उत्सुकता आता आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Apps, Social media app, South actress, South indian actor, Superstar rajnikant, Technology

    पुढील बातम्या