नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : भारतातील प्रत्येकासाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्याही सरकारी कामासाठी तसंच इतरही अनेक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड एका कागदावर बनवून येत होतं, जे अतिशय सांभाळून ठेवावं लागत होतं. पण आता UIDAIने आधार कार्ड पॉलिविनाइल क्लोराइड कार्डवर (PVC) रीप्रिंट करण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. UIDAIने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हे कार्ड अगदी एटीएम किंवा डेबिड कार्डसारखं सहज पाकिटात राहू शकेल.
UIDAIने ट्विट करत, आधार कार्ड पीव्हीसी कार्डवर प्रिंट करून घेता येणार असल्याचं सांगितलं. हे टिकाऊ आहे आणि दिसायला आकर्षकही आहे. तसंच लेटेस्ट सिक्योरिटी फिचर्ससह आहे. याच्या सिक्योरिटी फिचर्समध्ये hologram, Guilloche Pattern, ghost image आणि Microtextचा समावेश आहे.
वाचा - आता Youtube बनणार शॉपिंग हब; व्हिडीओतून सिलेक्ट करता येणार प्रोडक्ट
PVC प्रिंटची फी -
PVC कार्डवर आधार प्रिंट करण्यासाठी 50 रुपये फी भरावी लागेल. हे पीव्हीसी कार्ड एक प्रकारचं प्लास्टिक कार्ड आहे. तसंच हे वॉटर प्रुफही आहे.
Loaded with the latest security features, your Aadhaar is now more durable, convenient to carry, instantly verifiable offline. To order your Aadhaar PVC online, click https://t.co/TVsl6Xh1cX pic.twitter.com/79gfxaUga7
— Aadhaar (@UIDAI) October 12, 2020
कसं बनवाल पीव्हीसी आधार कार्ड -
- यासाठी UIDAIच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- त्यानंतर 'My Aadhaar'मध्ये 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा.
- त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्चुअल आयडी किंवा 28 डिजिट आधार एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल.
- त्यापुढे सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा कोड येईल.
- त्यानंतर Send OTP वर क्लिक करा
- रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी भरा.
- त्यानंतर ऑनलाईन फॉर्म सबमिट होईल.
Aadhaar PVC card is completely weather-proof. With good quality printing and lamination, you can now bring it everywhere without having to worry about it being damaged, even by the rain. Order your Aadhaar PVC online now https://t.co/TVsl6Xh1cX pic.twitter.com/8GTL9fXyYI
— Aadhaar (@UIDAI) October 11, 2020
या प्रोसेसनंतर स्क्रिनवर पीव्हीसी आधार कार्डचा प्रीव्ह्यू दिसेल. त्याखाली पेमेंटचा ऑप्शनही दिसेल. त्यावर क्लिक करुन 50 रुपये फी जमा करावी लागेल. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल.
वाचा - 'या' खास नंबरने असा मिळवा चोरी झालेला फोन
या प्रोसेसनंतर, UIDAI कडून 5 दिवसांत आधार प्रिंट करुन भारतीय पोस्टकडे पाठवलं जातं. त्यानंतर पोस्ट ऑफिसकडून स्पीड पोस्टद्वारे अर्जदाराच्या घरी PVC Aadhaar Card पोहचवलं जातं.