Home /News /technology /

आता आधार कार्ड धारकांना नाही मिळणार या 2 सुविधांचा लाभ; तुमच्यावर काय होणार परिणाम?

आता आधार कार्ड धारकांना नाही मिळणार या 2 सुविधांचा लाभ; तुमच्यावर काय होणार परिणाम?

युआयडीएआयने (UIDAI) वैध पत्राद्वारे पत्ता बदल (Addresses Update) करण्याची सुविधा आणि आधार कार्ड रिप्रिंटची सुविधा बंद केली आहे

नवी दिल्ली 27 ऑगस्ट : देशातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड (Aadhaar Card) असणं गरजेचं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे (UIDAI) जारी करण्यात येणारे आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचे ओळखपत्र आणि सरकारी दस्तावेज आहे. आधार कार्डाशिवाय कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही तसंच आर्थिक व्यवहारातही ते उपयोगी पडतं. अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांचं आधार कार्ड काढता येतं. यात बायोमेट्रिक माहिती (Biometric Information) असल्यानं लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यास ते अपडेट करावे लागते. तसेच आधार कार्ड हे महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने त्यात पत्ता बदल (Addresses Update) करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आधार कार्डबाबत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया वेळोवेळी नवनवीन सेवा उपलब्ध करत असते. सध्या मात्र युआयडीएआयने वैध पत्राद्वारे पत्ता बदल करण्याची सुविधा आणि आधार कार्ड रिप्रिंटची सुविधा बंद केली आहे. अमर उजालानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. Facebook वर आता छोट्या व्यवसायिकांना मिळणार कर्ज घेण्याची सुविधा,काय आहे प्रोसेस कोणत्याही एका अॅड्रेस प्रूफद्वारे पत्ता बदल शक्य : व्हॅलिडेशन पत्राद्वारे (Validation Letter) आधार कार्डवरील पत्ता अपडेट (Addresses Update) करण्याची सुविधा सध्या UIDAI ने बंद केली आहे. UIDAI च्या https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf या वेबसाइटवरील विविध पर्यायांच्या यादीतून कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही तुमचा पत्ता आता अपडेट करू शकता. कोणत्याही एका अॅड्रेस प्रूफद्वारे (Addresses Proof) आता पत्ता अपडेट करता येऊ शकतो. यामुळे भाडेकरू किंवा इतर आधारकार्ड धारक आपला पत्ता सहजपणे अपडेट करू शकतील. मात्र ज्यांच्याकडे कोणतेही वैध दस्तावेज नाहीत त्यांना पत्ता अपडेट करण्यात अडचण येऊ शकते. Yahoo भारतातली ही सेवा बंद करणार, पाहा तुमच्या अकाऊंटचं काय होणार? रिप्रिंट सुविधेतही बदल : UIDAI आता पॉलिव्हिनाल क्लोराईड (PVC) आधार कार्ड जारी करते. त्यामुळे जुन्या पद्धतीचं आधारकार्ड रिप्रिंट करून मिळण्याची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. हे नवीन पीव्हीसी स्वरूपातील कार्ड अतिशय आकर्षक असून, एटीएम कार्डाइतके छोटेसे आहे. पीव्हीसी कोटिंग असल्यानं ते पाण्याने खराब होण्याची किंवा तुटण्याचीही भीती नाही. पीव्हीसी स्वरूपातील आधारकार्ड फक्त 50 रुपये शुल्क भरून घरपोच मागवता येते. यासाठीची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. - पीव्हीसी आधारकार्ड ऑर्डर करण्यासाठी, uidai.gov.in या लिंकवर क्लिक करा. - नंतर ‘माय आधार’वर क्लिक करा. - ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करा. - आता वेबसाइटवर तुमचा 12 अंकी आधारकार्ड नंबर आणि कॅप्चा कोड किंवा सिक्युरिटी कोड टाका. - येथे तुम्हाला ‘मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही’ असे लिहिलेला एक कॉलम दिसेल. त्यावर टिक करा. - आता तुम्ही दिलेल्या पर्यायी मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) येईल. - ओटीपी टाकल्यानंतर, पेमेंटचा पर्याय येईल. पेमेंट केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.
First published:

Tags: Aadhar card, Aadhar card on phone

पुढील बातम्या