मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Yahoo भारतातली ही सेवा बंद करणार, पाहा तुमच्या अकाऊंटचं काय होणार?

Yahoo भारतातली ही सेवा बंद करणार, पाहा तुमच्या अकाऊंटचं काय होणार?

Yahoo ची भारतातली ही सेवा बंद

Yahoo ची भारतातली ही सेवा बंद

याहू (Yahoo) हे एक लोकप्रिय सर्च इंजिन (Search Engine). याहूची मेल सर्व्हिसदेखील अनेक युजर्स वापरतात. अमेरिकन वेब सर्व्हिस प्रोव्हायडर याहू ही कंपनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

मुंबई, 27 ऑगस्ट : याहू (Yahoo) हे एक लोकप्रिय सर्च इंजिन (Search Engine). याहूची मेल सर्व्हिसदेखील अनेक युजर्स वापरतात. अमेरिकन वेब सर्व्हिस प्रोव्हायडर याहू ही कंपनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अर्थात चर्चेचा विषय तितकाच महत्वाचा आहे. 26 ऑगस्ट 2021ला या कंपनीने भारतातील काही सेवा (Service) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे युजर्सला याहूच्या माध्यमातून प्रसिद्ध होणारा कंटेट (Content) आता वाचायला मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सर्वाधिक वापर होणाऱ्या सर्च इंजिनपैकी एक असलेल्या याहूने आता एक महत्वाचा निर्णय घोषित केला आहे. या निर्णयामुळे युजर्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. याहू भारतातील काही सेवा बंद करत असून, यात याहूच्या माध्यमातून आता कोणताही कंटेट पब्लिश (Publish) होणार नाही. परंतु, यामुळे युजर्सच्या याहू अकाउंट, ई-मेल आणि सर्च एक्सपिरियन्सवर (Search Experience) कोणाताही परिणाम होणार नसून, या सेवा यापुढेही युजर्सला मिळणार असल्याचे, टेक कंपनी वेरिझोन मीडियाची ओनरशीप (Ownership) असलेल्या याहू वेबपोर्टलकडून सांगण्यात आले आहे.

याहूने भारतात डिजीटल कंटेट ऑपरेट करणाऱ्या आणि प्रकाशित करणाऱ्या मीडिया कंपन्यांनी परदेशी मालकी मर्यादित करणाऱ्या नवीन परकीय थेट गुंतवणूक नियमांमुळे भारतातील त्यांच्या न्यूज वेबसाईटस बंद केल्या आहेत. यात याहू न्यूज, याहू क्रिकेट, फायनान्स, मनोरंजन आणि मेकर्स इंडिया यांचा समावेश आहे.

26 ऑगस्ट 2021 पासून याहू इंडिया कंटेंट पब्लिश करणार नाही. मात्र युजर्सच्या याहू अकाउंट, मेल आणि सर्च एक्सिपिरियन्स यावर कोणातही परिणाम होणार नाही, ते यापूर्वी होते तसेच सुरू राहणार आहेत. वाचकांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असे याहू वेबसाइटने आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

डिजीटल न्यूज मीडिया आऊटलेटमध्ये परदेशी निधी 26 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या भारत सरकारच्या नव्या नियमामुळे वेरिझॉन मीडियाने याहू इंडियाचे ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वेरिझॉन मीडियाने 2017 मध्ये याहू अधिग्रहित केली होती. नवीन आयटी नियमांचा अर्थ असा आहे की देशातील बातम्या आणि चालू घडामोडींबाबतचा व्यवसाय चालवण्यासाठी याहू इंडियाला त्यांच्या संपूर्ण मीडिया व्यवसायाची निश्चित वेळेत पुनर्रचना करावी लागेल.

याहू वेबसाईटवरील FAQ नुसार, कंपनीने देशभरात याहूचे कंटेंट ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतला असून, भारतात आता कंटेंट प्रसिध्द होणार नाही. भारतात डिजीटल कंटेंट ऑपरेट आणि प्रकाशित करणाऱ्या मीडिया कंपन्यांची परदेशी मालकी मर्यादित करण्याच्या अलीकडील नव्या नियामक कायद्यातील बदलामुळे याहूच्या ऑपरेशनवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे याहू मेल (Yahoo mail) किंवा याहू सर्चिंगवर कोणाताही परिणाम होणार नसून, ही सेवा पूर्वीसारखीच युजर्सला देण्यात येणार असल्याचे, याहूने स्पष्ट केले आहे.

First published: