मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Aadhaar ईआयडी किंवा यूआयडी हरवल्यास काय कराल? जाणून घ्या अधिक माहिती

Aadhaar ईआयडी किंवा यूआयडी हरवल्यास काय कराल? जाणून घ्या अधिक माहिती

आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला शासनानं आधार कार्ड काढून घेणं सक्तीचं केलेलं आहे. आधार कार्डमुळं (Aadhaar Card) नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत मिळते. अनेकदा आपलं आधार कार्डचा ईआयडी किंवा यूआयडी हरवतो. अशावेळी काय करावे आपल्याला समजत नाही. पण, काळजी करू नका, तुम्ही तुमचा आधार नंबर घरबसल्या मिळवू शकता.

पुढे वाचा ...

    मुंबई, 24 डिसेंबर : आपल्या देशात आता जवळपास सर्वच गोष्टींसाठी आधारकार्ड (Aadhaar Card) अनिवार्य करण्यात आलं आहे. आधार नोंदणी करताना प्रत्येकाला 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UID) किंवा 28 अंकी एनरोलमेंट आयडी (EID) मिळतो. आधारसाठी नोंदणी केल्यानंतर तुमचा हा यूआयडी क्रमांक नक्की नोट करून ठेवा. कारण, या क्रमांकाचा वापर करून घरबसल्या आधार रजिस्ट्रेशन स्टेटस चेक करता येतं. मात्र, काहींना हा क्रमांक नोट करून ठेवण्याचं लक्षात राहत नाही किंवा नोट केलेला क्रमांक हरवून जातो. अशा वेळी इतर काही मार्गांचा वापर करून यूआयडी क्रमांक पुन्हा मिळवतो येतो.

    यूआयडी किंवा इआयडी क्रमांक हरवल्यास, तुम्ही तो सहजपणे पुन्हा मिळवू शकता. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत वेबसाईट किंवा mAadhaar अॅपचा वापर करून UID/EID पुन्हा मिळवता येतो. त्यासाठी ओटीपीद्वारे (OTP) ऑथेंटिकेशन करावं लागेल.

    हरवलेला यूआयडी किंवा इआयडी क्रमांक पुन्हा मिळवण्यासाठी खालील सुचनांचं पालन करा -

    1) सर्वात अगोदर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

    2) त्यानंतर माय आधार सेक्शनमधील लॉस्ट रिट्रीव्ह आधार किंवा फरगॉटन ईआयडी/युआडी (Forgotten EID/UID) ऑप्शन वर क्लिक करा. याव्यतिरिक्त तुम्ही https://resident.uidai.gov.in/lost-uideid या लिंकवर क्लिक करून देखील यूआयडी मिळवू शकता.

    Flipkart चा धमाकेदार Sale! 1,735 रुपयांमध्ये खरेदी करा हा भन्नाट स्मार्टफोन

    3) यानंतर तुमच्याकडे जर यूआयडी असेल तर तो त्याठिकाणी टाका म्हणजे तुम्हाला ईआयडी (EID) शोधता येईल. किंवा याच्या उलट देखील होऊ शकतं. तुमच्याकडे ईआयडी असले तर तो टाका जेणेकरून तुम्हाला यूआयडी मिळवता येईल.

    4) आधार अॅप्लिकेशनवेळी टाकल्याप्रमाणं तुमचं पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाका.

    5) त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपी ऑप्शन वर क्लिक करा.

    6) तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. मिळालेला ओटीपी योग्य त्या ठिकाणी भरा त्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मिळतील.

    याव्यतिरिक्त तुम्ही, 1947 या UIDAI हेल्पलाईनवर कॉल करूनदेखील ईआयडी मिळवू शकता.

    फोन टॅपिंग म्हणजे काय? याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत?

    भारत सरकारनं जारी केलेलं आधार कार्ड हे नागरिकांच्या ओळखीचा पुरावा आहे. मात्र, नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरलं जात नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार धारकांना 12 अंकी युआडी देते. त्या क्रमांकाचा आधार घेऊन हे कार्ड भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वैध ठरतं.

    तुमचा हरवलेला आधार ईआयडी पुन्हा मिळवण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सबमिट करण्याची आवश्यकता नाही. फक्त आधार नोंदणी करताना तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सची गरज भासते, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. जर तुम्हाला स्वत: ही प्रक्रिया करता आली नाही तर, एखाद्या जाणकार व्यक्तीची मदत घेऊ शकता.

    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card on phone