Home /News /technology /

फोन टॅपिंग म्हणजे काय? याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत?

फोन टॅपिंग म्हणजे काय? याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत?

भारतात फोन टॅपिंग (phone tapping) करणं बेकायदेशीर ( Illegal) आहे. दोन व्यक्तींमधील संवाद तिसरी व्यक्ती विनापरवानगी ऐकत असेल तर असं करणं बेकायदेशीर ठरतं. अगदी सरकार देखील तुमचे फोन कॉल्स रेकॉर्ड करू शकत नाही.

मुंबई, 22 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत फोन टॅपिंगची (Phone Tapping) काही प्रकरणं घडल्याचं दिसून आलं आहे. राजकीय व्यक्ती किंवा प्रशासकीय व्यक्तींच्या बाबत हे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लवकरच काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) आहेत. भाजप, कॉंग्रेससह अनेक स्थानिक पक्ष, आघाड्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विविध पक्षांच्याकडून प्रचाराला देखील सुरवात झाली आहे. बेरोजगारी, महागाई, गरीबी या मुद्द्यांसोबतच प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. या आरोपांमध्ये फोन टॅपिंगचा मुद्दा विशेष गाजताना दिसत आहे. सत्ताधारी पक्ष अन्य पक्षांमधील नेत्यांचे फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप करताना दिसत आहे. त्यामुळे फोन टॅपिंग या मुद्द्याभोवतीच निवडणुका आणि पक्षीय राजकारण फिरणार हे आता जवळपास स्पष्ट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फोन टॅपिंग म्हणजे काय?, याबाबत कायदा काय सांगतो, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. कोणत्याही दोन व्यक्तींमधील फोनवरील संभाषण कोणतीही सूचना न देता तिसऱ्या व्यक्तीनं ऐकणं म्हणजे फोन टॅपिंग. याबाबतची सविस्तर माहिती `टीव्ही नाइन हिंदी`नं दिली आहे. गेल्या काही वर्षात वरिष्ठ नेत्यांचे फोन टॅप झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हा विषय जोरदार चर्चेत आहे. दोन व्यक्तींमधील फोनवरील संभाषण तिसऱ्या व्यक्तीनं कोणतीही सूचना न देता ऐकणं यालाच फोन टॅपिंग असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या मित्राशी फोनवरून संवाद साधत असताना तिसरी व्यक्ती (Third Person) तुमच्या परवानगीशिवाय, सूचना न देता तुमचा कॉल रेकॉर्ड करते, त्याला फोन टॅपिंग म्हणतात. याला वायर टॅपिंग किंवा लाइन बगिंग असंही म्हणतात. दुर्लक्ष न करता 31 डिसेंबर आधी ही कामे करुन घ्या, नवीन वर्षात त्रास होणार नाही भारतात फोन टॅपिंग करणं बेकायदेशीर ( Illegal) आहे. दोन व्यक्तींमधील संवाद तिसरी व्यक्ती विनापरवानगी ऐकत असेल तर असं करणं बेकायदेशीर ठरतं. अगदी सरकार देखील तुमचे फोन कॉल्स रेकॉर्ड करू शकत नाही. परंतु, फोन टॅपिंगबाबत सरकारला (Government) विशेष अधिकार असतात, आणि अपवादात्मक स्थितीत सरकार फोन टॅपिंग करू शकते. इंडियन टेलिग्राम अॅक्टनुसार, सरकार काही विशिष्ट परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे फोन टॅप करू शकते. या कायद्याच्या कलम (1) आणि (2) नुसार, सार्वजनिक आणीबाणी किंवा सावर्जनिक सुरक्षेचा मुद्दा असल्यास सरकार फोन टॅपिंग करू शकते. मात्र असं करण्यासाठी सरकारलादेखील अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. काही वेळा न्यायालयाच्या परवानगीनंतर फोन टॅपिंग करता येतं. परंतु, एखाद्या व्यक्तीसोबत अशी घटना घडल्यास तो न्यायालयात धाव घेऊ शकतो आणि मानवाधिकार आयोगाकडं (Human Rights Commission) याबाबत तक्रार दाखल करू शकतो. डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम? खरंतर जर एखादी व्यक्ती परवानगीशिवाय तुमचा फोन टॅप करत असेल तर असं करणं तुमच्या एका अधिकाराचं उल्लंघन ठरतं. हा अधिकार म्हणजे राइट टू प्रायव्हसी (Right to Privacy) अर्थात गोपनीयतेचा अधिकार. फोन टॅपिंगच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती या अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाही. फोन टॅपिंगचा उल्लेख भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम 5 (2) मध्ये आहे. या कायद्यानुसार सरकार देखील तुमचा फोन टॅपिंग करु शकत नाही. 1990 मध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर फोन टॅपिंग केस याचं उदाहरण आहे. फोन टॅपिंग हे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं या केसमध्ये न्यायालयानं म्हटलं होतं.
First published:

Tags: Phone

पुढील बातम्या