Home /News /technology /

Flipkart चा धमाकेदार Sale! 1,735 रुपयांमध्ये खरेदी करा हा भन्नाट फीचर्स असणारा स्मार्टफोन

Flipkart चा धमाकेदार Sale! 1,735 रुपयांमध्ये खरेदी करा हा भन्नाट फीचर्स असणारा स्मार्टफोन

ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या फ्लिपकार्टने (Flipkart) चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिवोच्या ( Vivo) सहकार्याने 22 डिसेंबर 21पासून खास ख्रिसमस सेल सुरू केला आहे. या मध्ये व्हिवो ख्रिसमस कार्निव्हलमध्ये (Vivo Christmas Carnival) व्हिवोच्या सर्व स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 23 डिसेंबर: सध्या ख्रिसमसचा सण (Christmas) आणि वर्षाअखेर निमित्त (Year End 2021) सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. ख्रिसमससाठी बाजारपेठा सजल्या असून, खरेदीला उधाण आलं आहे. यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांनीही (E-Commerce Companies Offers) दरवर्षीप्रमाणे यंदाही धमाकेदार सेलचे (Flipkart Sale)आयोजन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंगची चलती झाल्यानं जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंगची सुविधा देणाऱ्या कंपन्यांनी सेलच्या माध्यमातून ऑफर्सचा वर्षाव केला आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक वस्तू अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या फ्लिपकार्टने (Flipkart) चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिवोच्या ( Vivo) सहकार्याने 22 डिसेंबर 21पासून खास ख्रिसमस सेल सुरू केला आहे. या मध्ये व्हिवो ख्रिसमस कार्निव्हलमध्ये (Vivo Christmas Carnival) व्हिवोच्या सर्व स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट देण्यात आली आहे. 25 डिसेंबर 21पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये व्हिवोचे अनेक उत्तम स्मार्टफोन्स अगदी स्वस्त किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. हे वाचा-तुमचे कॉल्स सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सॲप आणणार नवं फीचर 1,735 रुपयांमध्ये फोन खरेदी करण्याची संधी या सेलमध्ये व्हिवोचा Y53s (Vivo Y53s) हा 22,990 रुपये किमतीचा उत्कृष्ट 4G स्मार्टफोन फक्त 1,735 रुपयांमध्ये मिळण्याची संधी आहे. या ड्युएल सिम स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असून, MediaTek Helio G80 वर काम करणार्‍या या स्मार्टफोनमध्ये 6.58-इंच फुल एचडी डिस्प्ले आणि 5,000 mAhची बॅटरी आहे. हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप सह येतो ज्यामध्ये मुख्य सेन्सर 64MPचा आणि उर्वरित दोन सेन्सर 2MPचे आहेत. तर फ्रंट कॅमेरा16MPचा आहे. हे वाचा-भविष्यातील घरं पाहुन व्हाल अचंबित! इथं भिंतीही तुमच्या हावभावावरुन करतील काम फ्लिपकार्टवर या फोनवर थेट 19 टक्के सूट (OFF)आहे, त्यामुळे तो 18 हजार 490 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचे (Axis Bank) क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक म्हणजेच 905 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसंच कोणतंही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 400 रुपयांची एक विशेष प्रीपेड ऑफर मिळेल. या दोन्ही सवलतीमुळे या स्मार्टफोनची किंमत 17 हजार 185 रुपयांपर्यंत खाली येईल. या फोनसाठी एक्सचेंज ऑफरदेखील (Vivo Phone Exchange Offer) देण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 15 हजार 450 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर तुमच्यासाठी व्हिवोच्या स्मार्टफोनची किंमत 17 हजार 185 रुपयांवरून केवळ 1 हजार 735 रुपयांपर्यंत खाली येईल. फ्लिपकार्टवरील ख्रिसमस कार्निव्हलमधील या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत हे लक्षात घ्या आणि लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या.
First published:

Tags: Flipkart, Vivo

पुढील बातम्या