जाहिरात
मराठी बातम्या / मनी / इनकम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं, यापैकी निवडा एक पर्याय

इनकम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं, यापैकी निवडा एक पर्याय

इनकम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं, यापैकी निवडा एक पर्याय

नव्या टॅक्स स्लॅबमुळे तुम्हाला कमी कर भरावा लागेल. शिवाय इनकम टॅक्स रिटर्न (New Tax Slab Rate)दाखल करण्यासाठी CA कडे जावं लागणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : नव्या टॅक्स स्लॅबमुळे तुम्हाला कमी कर भरावा लागेल. शिवाय इनकम टॅक्स रिटर्न (New Tax Slab Rate)दाखल करण्यासाठी CA कडे जावं लागणार नाही. पुढच्या वर्षी नोकरदारांना इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणं सोपं होणार आहे. सध्या ITR मध्ये कपात आणि सूट पाहावी लागते. हे सगळं तपासण्यासाठी सीए ची गरज लागते. आता मात्र तशी गरज लागणार नाही. कशी मोजायची टॅक्समधली सूट? नव्या टॅक्स स्लॅबबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केलं होतं. नागरिकांना इनकम टॅक्स भरण्याचे दोन पर्याय असतील, असं त्या म्हणाल्या. तुम्हाला सध्याचीच टॅक्स व्यवस्था हवी असेल तरीही ते शक्य आहे. नवी करव्यवस्था पहिल्या करव्यवस्थेच्या तुलनेत सोपी आहे पण त्यासाठी PPF, इन्शुरन्स पॉलिसी यासारख्या गुंतवणुकीतून सूट मिळवण्याची गरज उरणार नाही. आकडेमोडीतून होणार सुटका नव्या टॅक्स व्यवस्थेत ITR भरणं सोपं होईल कारण टॅक्समध्ये नेमकी किती सूट मिळेल याच्या आकडेमोडीत पडावं लागणार नाही. तुम्हाला जर नव्या व्यवस्थेनुसार टॅक्स भरायचा असेल तर आधीच भरलेला ITR फॉर्म दिला जाईल. (हेही वाचा : 1 एप्रिलपासून बदलणार या 2 बँकांची नावं, तुमच्या खात्यातल्या पैशांचं काय होणार?) महसूल सचिव अजय भूषण पांडेय यांनी म्हटलं आहे की येत्या आर्थिक वर्षात 2019-2020 साठी टॅक्स रिटर्न दाखल करयाचे असतील तर करदात्यांना दोन्ही पर्याय असतील. नव्या प्रणालीनुसार ITR भरायचा असेल तर ई फायलिंग पोर्टलवर जावं लागेल. इथे पहिल्यापासूनच भरलेला फॉर्म मिळेल. त्यामुळे हा फॉर्म भरणं सोपं आहे. तुम्हाला जर जुन्या प्रणालीनुसार ITR भरायचा असेल तर जुना फॉर्मही उपलब्ध होईल. यामध्ये आधीपासूनच ही माहिती भरलेली नसेल.इनकम टॅक्स विभागाने दरवर्षी 50 लाख रुपयांची कमाई करणाऱ्या पगारदार लोकांसाठी ITR -1 (Sahaj)जारी केला आहे. याच प्रकारे इतर श्रेणींसाठीही इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म जारी करण्यात आला आहे. ========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात