नवी दिल्ली, 24 जानेवारी : तुमची कमाई जर वर्षाला अडीच लाख रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्डाचा नंबर दिला नाही तर पगारामध्ये अडचणी येऊ शकतात. इनकम टॅक्स (Income Tax)विभागाच्या नव्या नियमानुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या कंपनीमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्डाचा नंबर दिला नाही तर त्याच्या पगारातून 20 टक्के TDS (Tax deducted at source)कापला जाईल. हा नियम का? हा नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (CBDT)हा नियम 16 जानेवारीपासून लागू केला आहे. TDS पेमेंटवर लक्ष ठेवण्यासोबतच महसूल वाढवण्यासाठीही हा नियम आणण्यात आलाय. 2018 - 2019 या आर्थिक वर्षात एकूण थेट करवसुलीमध्ये 37 टक्के वाटा यातून आला होता. हा कर कसा लागणार? तुमचा पगार अडीच लाख रुपये असेल तर तुमच्या पगारातून कराची कपात केली जाणार नाही. पण त्यापेक्षा जास्त पगार असेल आणि सगळ्या कपातीनंतर 20 टक्के कर लागणार असेल तर 20 टक्के TDS लागू होईल.नव्या वर्षातले पहिले 3 महिने नोकरी करणाऱ्यांसाठी ताणाचे असतात. दर महिन्याच्या खर्चासोबतच कर वाचवण्यासाठी सेव्हिंग करून वेगळे पैसे वाचवावे लागतात. (हेही वाचा : मोदी सरकारला मोठा धक्का! 20 वर्षांत पहिल्यांदाच करवसुलीत होऊ शकते घट) त्यामुळे अगदी अखेरच्या क्षणी घाई करण्यापेक्षा वर्षभराचंच प्लॅनिंग करणं जास्त चांगलं असतं.लाइफ इन्शुरन्स प्रिमियम, बँक एफडी, ट्यूशन फी, सुकन्या समृद्धी योजना (SSY), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ELSS, पेन्शन फंड्स अशा योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर कर लागत नाही. यासाठी दीड लाख (1.50)रुपयांची मर्यादा आहे. ===============================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.