मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

व्हा अधिक स्मार्ट! आता मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून बाळगा Aadhaar Card; वाचा संपूर्ण प्रक्रिया

व्हा अधिक स्मार्ट! आता मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून बाळगा Aadhaar Card; वाचा संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar card Update: mAadhaar App डाऊनलोड केल्यानंतर आता नागरिकांना कागदाच्या स्वरुपात 'आधार कार्ड' सोबत बाळगण्याची गरज नाही.

Aadhaar card Update: mAadhaar App डाऊनलोड केल्यानंतर आता नागरिकांना कागदाच्या स्वरुपात 'आधार कार्ड' सोबत बाळगण्याची गरज नाही.

Aadhaar card Update: mAadhaar App डाऊनलोड केल्यानंतर आता नागरिकांना कागदाच्या स्वरुपात 'आधार कार्ड' सोबत बाळगण्याची गरज नाही.

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : शासकीय, बॅंकिंग, परवाना आदी सर्व शासकीय किंवा वैयक्तिक कामांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य आहे. एक प्रमुख केवायसी म्हणून आधारकार्डाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आधार कार्ड (Aadhar Card) हा महत्वाचा दस्तावेज आहे. यापूर्वी प्रत्येक कामासाठी युजरला आधारकार्डाची हार्डकॉपी जवळ बाळगावी लागत असते. मात्र आता ही हार्डकॉपी जवळ बाळगण्याची गरज नाही. कारण डिजिटलायझेशनमुळे अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आधारकार्डाचा सर्व तपशील तुमच्या स्मार्टफोनवर (SmartPhone) सहज उपलब्ध होऊ शकतो. डिजिटल इंडियाला (Digital India) प्राधान्य देण्यासाठी सरकारने 2017 मध्ये एम-आधार अॅप (mAadhar App) लाॅन्च केले. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर युझर्सला पेपर फाॅरमॅटमधील आधारकार्ड बाळगण्याची गरज नाही. हे अॅप युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने (UIDAI) तयार केले आहे. आता या अॅपमध्ये युआयडीएआयने एक नवी सुधारणा केलीय. यानुसार आता एम-आधार अॅपमध्ये 5 जणांची आधारकार्ड प्रोफाईल अॅड करणे शक्य होणार आहे. युआयडीएआयने याबाबत व्टिटरवरुन माहिती दिली. यापूर्वी एम-आधार अॅपवर तीन प्रोफाईल अॅड करता येत होत्या. या अॅपमध्ये युझरचे नाव,जन्मतारीख, लिंग, पत्त्यासोबतच फोटोग्राफ आणि आधार क्रमांक लिंक असतो. गुगल स्टोअरवरुन डाऊनलोड करा अॅप हे एम आधार अॅप युझर्स गुगल प्ले स्टोअरवरुन (Goole Play Store) डाऊनलोड करु शकतात. हे अॅप वापरण्यासाठी युझर्सला रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. जर क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर युझर्सने जवळील आधार एनरोलमेंट सेंटरवर जाऊन तो रजिस्टर्ड करावा.

हे देखील वाचा -    आता आलं mAadhaarApp; घरबसल्याच करा Aadhaar Card संबंधी 35 कामं

5 आधारकार्ड प्रोफाईल अॅड करता येणार जर तुम्हाला या अॅपमध्ये 5 प्रोफाईल अॅड करायच्या असतील तर पाचही आधारकार्डांसाठी ज्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड केले आहे, तोच मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. मोबाइलमध्येच बाळगा आपले आधारकार्ड खासगी डेटा सुरक्षित राहवा यासाठी या अॅपमध्ये बायोमेट्रीक लाॅकिंग आणि अनलाॅकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या अॅपमध्ये ओटीपी (OTP) सिस्टीम देखील आहे. या सिस्टीमव्दारे आॅटोमॅटीकली टेम्परेरी पासवर्ड जनरेट होईल. या अॅपच्या माध्यमातून युझर्स आपली प्रोफाईल अपडेट करु शकतील. हे अॅप वापरल्यास युझर्सला आधारकार्डाची हार्डकापी जवळ बाळगण्याची गरज राहणार नाही.
First published:

Tags: Aadhar card, Digital services, M aadhar card, Technology, UIDAI

पुढील बातम्या