मुंबई, 09 ऑक्टोबर: सध्या महत्त्वाची असणारी सर्व कागदपत्र डिजिटली वापरण्याची सुविधा देण्यात येते आहे. सर्वात महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे आधार कार्डची देखील अनेकजण हार्ड कॉपी (Hard Copy of Aadhaar Card) न वापरता ई-आधार वापरण्याला पसंती देतात. कोणत्याही कामासाठी आधारची आवश्यकता भासल्यास सहजपणे ई-आधार दाखवता येते. दरम्यान हे ई-आधार किती वैध (How Valid is E-Aadhaar?) आहे आणि त्याचा कुठे वापर करता येतो? असा सवाल उपस्थित राहत असेल. जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं.
ई-आधारच्या वैधतेबाबत (Validity of E-aadhaar)आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI च्या वेबसाइटवर महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यानुसार ज्याप्रमाणे तुमचं मुळ आधार कार्ड किंवा आधार कार्डची हार्ड कॉपी जेवढी वैध आहे तेवढीच वैधता ई-आधारला आहे. अर्थात ई-आधारही योग्य दस्तावेज आहे. इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटली याचा वापर केला जात असल्याने त्याला ई-आधार (E-Aadhaar) म्हटले जाते. हा इलेक्ट्रॉनिक दस्तावेज पासवर्डने सुरक्षित असतो. तुम्ही UIDAI च्या साइटवर जाऊन ही इलेक्ट्रॉनिक कॉपी मिळवू शकता.
वाचा-तुमच्या सुरक्षेसाठी Googleने टाकलं महत्त्वाचं पाऊल, आता करावं लागणार केवळ हे काम
ई-आधार मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे. आधार क्रमांक नसल्यास एनरोलमेंट नंबर असला तरी चालेल. शिवाय तुम्हाला पूर्ण पत्ता द्यावा लागेल. आधार कायद्यानुसार, आधार कार्डच्या हार्ड कॉपी प्रमाणेच ई-आधार सर्व कामांसाठी व्हॅलिड आहे. ज्याठिकाणी डिजिटली काम होते, त्या सर्व ठिकाणी ही कॉपी मान्य केली जाईल. https://uidai.gov.in/images/uidai_om_on_e_aadhaar_validity.pdf या लिंकवर क्लिक करून तुम्ही ई-आधारच्या वैधतेविषयी अधिक माहिती मिळवू शकता.
वाचा-QR Code ने पेमेंट करताना सावधान, अशी घ्या काळजी
कशाप्रकारे कराल डाउनलोड?
आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट नंबर प्रविष्ट करून तुम्ही ई-आधार डाऊनलोड करू शकता. या डाउनलोडिंच्या प्रक्रियेदरम्यान तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card