कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. यात अनेकांकडून QR Code स्कॅन करुन पेमेंट करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. पेट्रोल पंप, दुकानदार किंवा इतर ठिकाणी QR Code ने ऑनलाईन पेमेंट केलं जातं. परंतु अशाप्रकारे क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करताना काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.
Quick Response (QR) सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आलं होतं. आता भारतात याचा वापर अतिशय सहजपणे होतो. एकीकडे डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली असली, तरी दुसरीकडे मात्र ऑनालाईन फ्रॉडचं प्रमाणही वाढलं आहे.
2/ 7
कॉन्टॅक्टलेस पेमेंट करताना अनेक जण QR कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करतात. फसवणूक करणारे त्याचाच फायदा घेतात. ते QR कोड बदलतात. ज्यामुळे पेमेंट फ्रॉडस्टर्सच्या अकाउंटमध्ये जातं.
3/ 7
असा QR कोड बदलून, दुसरा QR कोड टाकण्याला QR कोड फिशिंग असं म्हटलं जातं. ज्यामुळे तुमचे पैसे दुकानदाराला न जाता, फसवणूक करणाऱ्याच्या अकाउंटला जमा होतात.
4/ 7
पेट्रोल पंप किंवा एखाद्या दुकानदाराकडे QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यास तिथे फसवणूक करणारे फ्रॉडस्टर्स ओरिजनल QR कोडला आपल्या QR कोडशी बदलतात. ज्यामुळे QR कोड स्कॅन करून होणारं पेमेंट स्कॅमर्सच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतं.
5/ 7
दुकानदार किंवा इतर कोणत्याही ठिकाणी QR कोड स्कॅन करून पेमेंट करताना सावध राहा. QR कोड स्कॅन करताना त्यात येणाऱ्या रिसिव्हरचं नाव आधी कन्फर्म करा. मेसेज किंवा ईमेलवर आलेल्या कोणत्याही QR कोडला स्कॅन करू नका.
6/ 7
QR कोड फोनच्या कॅमेरातून थेट स्कॅन करण्याऐवजी, अशा App द्वारे करा, जो QR कोडचे डिटेल्सही सांगतो.
7/ 7
QR कोड स्कॅन झाल्यानंतर बँकेतून झालेल्या कोणत्याही ट्रान्झेक्शनकडे लक्ष द्या आणि काही चुकीचं आढळल्यास त्वरित तक्रार दाखल करा. तसंच ऑनलाईन फ्रॉडबाबत सायबर सेलमध्येही युजर्स तक्रार दाखल करू शकतात.