मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता मोबाईल नंबरशिवाय डाउनलोड करता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस

आता मोबाईल नंबरशिवाय डाउनलोड करता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस

UIDAI ने वापरकर्त्यांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड डाऊनलोड (Aadhaar Card download) करू शकता.

UIDAI ने वापरकर्त्यांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड डाऊनलोड (Aadhaar Card download) करू शकता.

UIDAI ने वापरकर्त्यांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड डाऊनलोड (Aadhaar Card download) करू शकता.

नवी दिल्ली, 4 जून : सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) हे सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय आपण कोणतंचं सरकारी काम करू शकत नाही. अशात जर कधी आपलं आधार कार्ड हरवलं, तर फार अडचण होते. आधार कार्ड हरवलं आणि त्यासोबत रजिस्टर असलेला आपला मोबाईल नंबर आपल्या लक्षात नसेल तर ते आधार कार्ड परत कसं मिळवायचं हा प्रश्न पडतो. हीच समस्या सोडवण्यासाठी UIDAI ने वापरकर्त्यांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड डाऊनलोड (Aadhaar Card download) करू शकता.

UIDAI च्या माहितीनुसार, आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी एक रजिस्टर्ड मोबाइल नंबर (registered mobile number) असणं बंधनकारक नाही. ज्यांच्याजवळ आधार कार्डसोबत मोबाइल नंबर रजिस्टर्ड नाही, असे लोक यूआईडीएआईच्या uidai.gov.in या वेबसाईटवर लॉग-इन करून आपल्या आधार कार्डवरील 12 अंकी आधार क्रमांक तिथे टाकून आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करू शकतात.

मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा -

- सर्वात आधी UIDAI च्या uidai.gov.in या वेबसाईटवर लॉग-इन करा.

- त्यानंतर 'माय आधार' (My Aadhaar) हा पर्याय निवडा.

- आता Order Aadhaar Reprint वर क्लिक करा.

- त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी VID नंबर टाका, त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका.

- नंतर 'My Mobile number is not registered' ऑप्शनवर क्लिक करा.

- आता जो मोबाईल नंबर आधार नंबरसोबत रजिस्टर्ड नाही तो तिथे भरा.

- Send OTP वर क्लिक करा.

- नियम आणि अटी-शर्तीच्या पर्यायासमोर दिलेल्या बॉक्समध्ये चेक-इन करा.

- त्यानंतर Submit बटनवर क्लिक करा.

- ऑथेंटिकेशन आल्यानंतर कम्प्यूटर मॉनिटरवर 'Preview Aadhaar Letter' दिसेल.

- यानंतर ई-आधार डाऊनलोड करण्यासाठी पेमेंट करा.

- सर्वात शेवटी तुमच्या ई-आधार कार्डची पीडीएफ डाउनलोड करा.

(वाचा - PAN-Aadhaar घरबसल्या करा लिंक; असं तपासा तुमचं Linking Status)

UIDAI ने सुरू केलंय PVC कार्ड -

UIDAI ने आधार कार्डची सुरक्षितता लक्षात घेत, काही दिवसांपूर्वीच Aadhaar PVC कार्डची सुरुवात केली आहे. कोणताही आधार कार्ड धारक UIDAI च्या वेबसाइटवरून नवीन PVC Card ऑर्डर करू शकतो. UIDAI ने सांगितलं की, नवीन पोलिव्हिनाइल क्लोराइड (PVC) Aadhaar Card ला सोबत कॅरी करणं खूप सोपं आहे. याची साईझ छोटी असते आणि तुम्ही ते कार्ड तुमच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये आरामात ठेवू शकता.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, Aadhar card link