नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : इंटरनेटने (Internet) आपलं आयुष्य सोपं केलं आहे. पण दुसरीकडे मात्र इंटरनेट, डिजीटल गोष्टींमुळे अनेक गोष्टींचा धोकाही वाढला आहे. हॅकर्सकडून (Hackers) आतापर्यंत अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे वाढती हॅकिंग (Hacking) प्रकरणं पाहता काही गोष्टी लक्षात घेणं फायद्याचं ठरेल.
डिजीटल क्रांतीच्या या जगात संपूर्ण जगातील माहिती एका क्लिकवर, काही सेकंदात तुमच्यापर्यंत पोहोचते. अशीच युजर्सची पर्सनल माहितीही काही सेकंदात हॅकर्सपर्यंत पोहोचू शकते. युजरच्या केल्या जाणाऱ्या डेटाच्या हेराफेरीलाच हॅकिंग म्हणतात. हॅकिंगमुळे देशातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकाही चिंतेत आहे. अनेक प्रयत्न करुनही अमेरिका देशही सायबर हल्ले रोखण्यास असमर्थ ठरला आहे. हॅकर्स दररोज विविध मार्गांनी, नवनवीन पद्धतींनी अनेकांची फसवणूक करत आहेत.
कोरोना काळात भारतात हॅकिंग प्रकरणात 29 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यात भारतीय कंपन्यांवर दर आठवड्याला जवळपास 1738 वेळा सायबर अटॅक झाला आहे. तर अनेक लोकांची खासगी माहिती, बँकिंग डिटेल्सही सायबर अटॅकमध्ये लीक करण्यात आले आहेत. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
- डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे.
- मोबाईल किंवा लॅपटॉपवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
- अनवेरिफाईड ईमेल अटॅचमेंट कधीही डाउनलोड करू नका.
- अनेकदा मालवेअर ईमेलमधील लिंकद्वारे पाठवले जातात. त्यामुळे कोणीही पाठवलेली अटॅचमेंट ओपन करू नका.
- कोणतीही समस्या आल्यास सायबर सेलकडे तक्रार करा. cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार करता येते. त्याशिवाय कोणताही सायबर क्राईम रिपोर्ट करण्यासाठी 155260 या क्रमांकावर कॉल करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.