मुंबई, 10 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) दोन वर्षाहून अधिक काळ रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केली नव्हती. त्यामुळे ग्राहकांनी या दरम्यान स्वस्त कर्जाचा फायदा उचलला. मात्र आता हळूहळू बँकांनी आपले व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर आणि सीआरआरमध्ये वाढ केल्यानंतर, अनेक बँका हळूहळू कर्जाचे वाढीव व्याजदर जाहीर करत आहेत. आणखी दोन बँकांनी MCLR वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या बँकांकडून गृह, वाहन, वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारची कर्जे घेणे महाग झाले आहे. यासाठी ग्राहकांना आता जास्त ईएमआय द्यावा लागणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) आणि करूर वैश्य बँकेने (Karur Vysya Bank) कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आपला सर्व-कालावधीचा MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. नवीन दर 7 मे 2022 पासून लागू झाले आहेत. याशिवाय, करूर वैश्य बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क दर 7.15 टक्क्यांवरून 7.45 टक्के केला आहे. Explainer | रुपया कमकुवत किंवा मजबूत झाला तर काय होतं? सर्वसामान्यांवर कसा होतो परिणाम एक वर्षाचा MCLR 7.25 टक्क्यांवरून 7.4 टक्के करण्यात आला आहे, असे सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने नियामक फाइलिंगमध्ये सांगितले आहे. इतर मुदतीसाठी MCLR देखील 0.15 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. सहा महिन्यांपर्यंतच्या विविध कालावधीसाठी MCLR आता 6.85-7.3 टक्क्यांवर गेला आहे. बँकेने म्हटले आहे की त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) देखील वाढवला आहे. त्यात 0.40 टक्के वाढ करण्यात आली आहे. बँकेचा RLLR आता 6.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. आर्थिक संकटात न अडकता चिंतामुक्त जीवन जगा! पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसाठी फॉलो करा ‘या’ पाच टिप्स खाजगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये, असे म्हटले आहे की त्यांनी EBR-R (एक्सटर्नल बेंचमार्क रेट-रेपो लिंक्ड) मध्ये बदल केले आहेत. तो 7.15 टक्क्यांवरून 7.45 टक्के करण्यात आला आहे. करूर वैश्य बँकेचे नवीन दर 9 मे 2022 पासून लागू झाले आहेत. यापूर्वी HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा यांनीही MCLR वाढवण्याची घोषणा केली होती. MCLR म्हणजे काय? रिझव्र्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता व्यावसायिक बँका बेस रेटऐवजी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वर कर्ज देतात. MCLR निश्चित करण्यात मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड महत्त्वाची भूमिका बजावते. रेपो दरात बदल झाल्यावर या फंडात बदल होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.