Home /News /technology /

Smartphones: स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी! खास फिचर्सनी युक्त 3 स्वस्त फोन या आठवड्यात होणार लॉन्च

Smartphones: स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी! खास फिचर्सनी युक्त 3 स्वस्त फोन या आठवड्यात होणार लॉन्च

स्वस्त अन् दमदार! या आठवड्यात लॉन्च होत आहेत 3 स्मार्टफोन; जाणून घ्या फिचर्स

स्वस्त अन् दमदार! या आठवड्यात लॉन्च होत आहेत 3 स्मार्टफोन; जाणून घ्या फिचर्स

Best Smartphones in India: Realme पासून Samsung आणि Poco पर्यंत विविध कंपन्यांचे स्मार्टफोन या आठवड्यात लॉन्च होणार आहेत. हे तिन्ही फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकले जाणार आहेत.

  मुंबई, 19 जून: जर तुम्ही नवा स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पुढील आठवड्यामध्ये विविध कंपन्यांचे दमदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. त्यामुळे जूनचा हा आठवडा स्मार्टफोनप्रेमींसाठी खास ठरणार आहे. Realme पासून Samsung आणि Poco पर्यंत विविध कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. विशेष बाब म्हणजे हे तिन्ही फोन विविध किंमतींचे असतील. यांपैकी काही फोन परवडणाऱ्या किंमतीचे असतील, त्यामुळे बजेटची चिंता करण्याची गरज नाही. हे तिन्ही फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकले जाणार आहेत. चला जाणून घेऊया या फोनची अधिक माहिती: 1. Realme C30- Realme C30 भारतात 20 जून रोजी फ्लिपकार्टवर लॉन्च होईल. हा स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसरद्वारे समर्थित असून त्यामध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास जाडी 8.5 मिमी आणि वजन 182 ग्रॅम आहे. बॅक पॅनलमध्ये वर्टिकल स्ट्राइप डिझाइन उपलब्ध आहे. मागील बाजूस फक्त एक कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 10 हजारांपेक्षा कमी रेंजमध्ये आणला जाऊ शकतो. हेही वाचा-तुमचा स्मार्टफोन हरवला आहे? Google Maps च्या मदतीने काही मिनिटांत शोधा, ही आहे प्रोसेस
  2. Samsung Galaxy F13- हा सॅमसंग स्मार्टफोन 22 जून रोजी लाँच होणार आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, Galaxy F13 मध्ये फुलएचडी + LCD डिस्प्ले, 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी देण्यात येणार आहे. फोनमध्ये ऑटो डेटा स्विचिंग फिचर देखील देण्यात आले आहे. फोटोंनुसार, हे स्पष्ट आहे की फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. त्याची किंमत सुमारे 20 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. हेही वाचा- या पद्धतीने सुरक्षित करा आपलं आधार कार्ड; कोणीही करू शकणार नाही गैरवापर
  3. Poco F4 5G- Poco F4 5G स्मार्टफोनचे लॉन्चिंग 23 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता होईल. हा फोन Snapdragon 870 प्रोसेसरवर चालेल आणि यामध्ये E4 सुपर AMOLED डिस्प्ले असेल. फोनमध्ये LiquidCool 2.0 देखील आहे, ज्यामुळे फोन गरम होत नाही. फोनला 1300 nits पीक ब्राइटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट देखील मिळणार आहे. यात 64MP प्राथमिक कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.
  Published by:user_123
  First published:

  Tags: Oppo smartphone, Smartphone, Smartphones

  पुढील बातम्या