नवी दिल्ली, 20 जून : वर्क फ्रॉमहोम आणि ऑनलाईन शाळांमुळे अधिकतर लोक घरातच आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायात मोठी वाढ होत आहे. लोक ऑनलाईन काम करतात, तर मुलं ऑनलाईन शिकत आहेत. याचदरम्यान ऑनलाईन गेमचा बाजारही वेगात वाढतो आहे. केपीएमजीच्या एका रिपोर्टनुसार, भारतात ऑनलाईन गेमिंग सेगमेंटमध्ये येणाऱ्या वर्षात 2021 ते 2025 दरम्यान 21 टक्क्यांची ग्रोथ होईल, जो जवळपास 29 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. तुम्ही स्टार्टअपद्वारे ऑनलाईन गेमिंग व्यवसायात एन्ट्री करू शकता.
2011 मध्ये इतक्या हजार कोटींचा व्यवसाय -
केपीएमजीच्या रिपोर्टनुसार 2011 मध्ये भारतात 13 हजार 600 कोटी रुपयांच्या ऑनलाईन बिजनेसची उलाढाल होती. या व्यवसायात ऑनलाईन कॅज्युएल गेमिंग सेगमेंट सर्वात महत्त्वपूर्ण आहे, ज्याचा महसूल 44 टक्क्यांसह 6 हजार कोटी रुपये आहे. 42 कोटी गेम खेळणाऱ्यांसह ऑनलाईन कॅज्युएल गेमिंग सेगमेंटमध्ये गेल्या 10 वर्षांत एकूण गेमर्सचा 97 टक्के सहभाग होता. 2025 पर्यंत ही टक्केवारी अशीच राहणार असल्याचा अंदाज आहे.
रिपोर्टनुसार, आधी गेमर्स स्मार्टफोनद्वारे गेम खेळायचे, परंतु आता अधिक चांगल्या एक्सपीरियन्ससाठी गेमर्स डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोठ्या स्क्रीनवाल्या टीव्हीकडे वळले आहेत. यात गेमर्सला अधिक चांगले ग्राफिक्स, मोठी स्क्रीन, चांगली साउंड क्वालिटी आणि ईझी कंट्रोल मिळतो.
कम्प्युटरची वाढती मागणी -
पॉप्युलर कम्प्युटर मेकर कंपनी HP ने 25 शहरांत 15 ते 40 वर्ष वयोगटातील 1500 लोकांबाबत सर्व्हे केला. ज्यात अनेक लोक गेम केवळ लॉकडाउनमध्येच खेळत नव्हते, तर मागील कित्येक वर्षांपासून ते गेम खेळत होते. ऑनलाईन गेमच्या वाढल्या ट्रेंडमुळे कम्प्युटरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जर तुम्हीही ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या बिजनेसचा फायदा घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला यासाठी स्मार्टफोन आणि कम्प्युटरच्या व्यवसायात उतरावं लागेल. ऑनलाईन गेम या दोन्ही डिव्हाईसशिवाय खेळले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे या ऑनलाईन व्यवसायाचा फायदा घेतला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.