Home /News /sport /

निवृत्तीनंतर बायकोच्या ‘ताला’वर नाचणार युवी, क्रिकेट सोडून करणार हे काम

निवृत्तीनंतर बायकोच्या ‘ताला’वर नाचणार युवी, क्रिकेट सोडून करणार हे काम

निवृत्तीनंतर युवराज सिंगची सेकंड इनिंग, बायकोसोबत करणार हे काम.

    नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने गेल्या वर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर युवीने अनेक टी-20 लीगमध्ये भाग घेतला आहे. मात्र, आता युवराज सिंग अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्याच्या तयारीत आहेत. युवराज लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो आपली पत्नी हजल कीच आणि भाऊ जोरावर सिंगसोबत काम करणार आहे. सिक्सर किंग युवराज सिंगने भारताला 2007चा टी-20 आणि 2011चा वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर कॅन्सर झाल्यानंतर त्यानं क्रिकेटमधून विश्रांती घेतली. मात्र युवीला विशेष चांगली कामगिरी त्यानंतर करता आली नाही. अखेर 2019मध्ये त्यानं निवृत्ती जाहीर केली. युवराज सिंगची पत्नी हेजल कीच अभिनेत्री असून तिने, बॉडीगार्ड, बिल्ला आणि हीर-हीरो सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. वाचा-मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! IPLआधी फिट होणार रोहितचा हुकुमी एक्का या प्रोडक्शन हाउसने याआधी टी-सीरीजोसोबत (T-Series) गुवाहटीमध्ये स्टेजवर्क अकादमीची सुरुवात केल होती. यामुळे गुवाहाटीसह पूर्वोत्तर भागातील खेळाडूंना संधी मिळाली. त्याचवेळी प्रोडक्शन बॅनरची नीता सरमा म्हणाली, 'माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याचा भाऊ जोरावरसिंग यांच्यासमवेत वेब सीरिज बनवण्याचा बहुमान आहे. आमचा प्रयत्न आहे की आसाममधील तरुण प्रतिभा आपल्या टी-मालिकेसह स्वप्नातील प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करायला मिळेल’, असे सांगितले. वाचा-राजस्थान रॉयल्स संघाच्या स्टार खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात वेब सीरिजमध्ये काम करणार युवराज युवराज काम करत असलेली वेब सीरिज ही ड्रीम हाऊस प्रॉडक्शनद्वारे निर्मित केली जाणार आहे. या प्रॉडक्शन बॅनरची निर्माती नीता सरमा यांनी, जोरावार सिंग या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याची आई शबनम सिंगही याचा हिस्सा असणार आहे. या वेब सीरिजमुळे लोकांना युवराज आणि जोरावर सिंग यांना खरोखर ओळखण्याची संधी मिळेल. तसेच, युवीची आई शबनम सिंग यांनी, वेब सीरीज मुख्यत: माझा लहान मुलगा जोरावरवर आहे. एक आई म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांबरोबर सूनही काम करणार आहे, यासाठी मी खुश आहे, असे सांगितले. वाचा-VIDEO : ‘आमचे कांदे खाता, मग क्रिकेट खेळायला काय?' पाक क्रिकेटपटूची भारतावर टीका भारताचा सिक्सर किंग आहे युवी 38 वर्षीय युवराज सिंगने ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्यांसाठी मदत केली होती. युवीनं यासाठी बुश फायर लीग या चॅरिटी स्पर्धेत भाग घेतला होता. तर, भारताकडून युवीच्या नावावर टी-20मध्ये सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम आहे. 58 टी-20 सामन्यात त्यानं 1177 धावा केल्या आहेत. ज्यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, Yuvraj singh

    पुढील बातम्या