Home /News /sport /

VIDEO : ‘आमचे कांदे खाता, मग क्रिकेट खेळायला काय?' पाक क्रिकेटपटूची भारतावर टीका

VIDEO : ‘आमचे कांदे खाता, मग क्रिकेट खेळायला काय?' पाक क्रिकेटपटूची भारतावर टीका

भारत-पाकिस्तान यांच्यात 2013नंतर एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. गेली अनेक वर्ष दोन्ही देशातील खेळाडू भारत-पाकमध्ये सामने व्हावेत, यासाठी प्रयत्न करत आहेत.

    कराची, 19 फेब्रुवारी : भारत-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील धुसफूस साऱ्या जागासमोर आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या खेळांवरही झाला आहे. यामुळेच भारत-पाकिस्तान यांच्यात 2013नंतर एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. गेली अनेक वर्ष दोन्ही देशातील खेळाडू भारत-पाकमध्ये सामने व्हावेत, यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाक क्रिकेट संबंधावर भारतावर टीका केली आहे. शोएबनं दोन्ही देशांतील परिस्थितीवर भाष्य करत, दोन्ही देश एकमेकांचे कांदे-बटाटे खातात, व्यवहार करत मग क्रिकेट खेळायला काय हरकत आहे. आपल्या यु-ट्युब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करत शोएबनं टीका केली आहे. शोएबनं यावेळी भारत-पाक यांच्यात तिसऱ्या देशात तरी सामने व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. वाचा-इन्स्टाग्रामवर रोनाल्डोसमोर विराट 'गरीब', फुटबॉलपटूची वर्षाची कमाई थक्क करणारी सध्या भारताचा कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. एवढेच नाही तर भारतात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी पाक संघाला भारत सरकारने व्हिसाही दिला आहे. टेनिसमधील डेव्हिस कपमध्येही हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र भारत-पाक यांच्यात केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये क्रिकेट सामने होतात. वाचा-क्रिकेट प्रेमींना ICC देणार मोठं गिफ्ट, आता वर्ल्ड कपसारखी आणखी एक स्पर्धा वाचा-श्रीनिवासनंतर आणखी एक इंडियन बोल्ट, 100 मीटर अंतर फक्त 9.51 सेकंदात केलं पार? क्रिकेट खेळायला काय? दोन्ही देशांमधील शेवटची मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर पाकिस्तान संघ तीन वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात आला. दोन्ही संघांचा शेवटचा कसोटी सामना 13 वर्षांपूर्वी 2007 मध्ये खेळला गेला होता. मात्र, दोन्ही संघ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत एकमेकांविरूद्ध खेळले आहेत. शोएबने याचाच उल्लेख करत "आम्ही कबड्डी खेळू शकतो, डेव्हिस चषकात खेळू शकतो, मग क्रिकेटमध्ये काय हानी आहे?" आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषक देखील तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातात. द्विपक्षीय मालिकेतही असेच होऊ शकते. " वाचा-द्रविडच्या लेकानं 2 महिन्यात ठोकले दुसरे दुहेरी शतक पाहुणचारात पाकिस्तान अव्वल पाहुणचारांच्या बाबतीत शोएबने पाकिस्तानला जगातील सर्वोत्तम देश म्हणून वर्णन केले. म्हणाले, “विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली किंवा सचिन तेंडुलकर यांना विचारा. आम्ही किती छान पाहुणचार करतो. तेथे जे काही फरक असू शकतात परंतु यामुळे क्रिकेटचे नुकसान होऊ नये. भारत-पाकिस्तान लवकरच द्विपक्षीय मालिका खेळेल अशी माझी अपेक्षा आहे. यासाठी तटस्थ ठिकाण निवडले जाऊ शकते", असे सांगितले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, India vs pakistan

    पुढील बातम्या