मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'रोहित शर्मा गाढव आहे कारण...', का उडवली युवराजनं हिटमॅनची खिल्ली?

'रोहित शर्मा गाढव आहे कारण...', का उडवली युवराजनं हिटमॅनची खिल्ली?

बुमराह आणि माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यांच्यात यांनी इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये रोहितची खिल्ली उडवली.

बुमराह आणि माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यांच्यात यांनी इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये रोहितची खिल्ली उडवली.

बुमराह आणि माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यांच्यात यांनी इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये रोहितची खिल्ली उडवली.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे घरी कैद झालेले भारतीय क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची संवाद साधत असतात. भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह यांच्यासह सर्व खेळाडू इन्स्टाग्रामवर लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधतात. असाच संवाद बुमराह आणि माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यांच्यात झाला. यावेळी या दोघांनी क्रिकेटबाबत चर्चा करत रॅपिड फायरही खेळले.

रॅपिड फायर खेळताना युवीनं भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला गाढव म्हंटले. लाइव्ह सेशनमध्ये बुमराहनं युवीला 11 प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची पाच सेकंदात देण्याचे सांगितले होते. बुमहारनं युवीला हा नंबर गेम सारखा खेळ आहे की नाही? असा प्रश्न विचारला त्यावर युवराजने उत्तर देऊन असे म्हटले की हा खेळ नंबरता नाही. त्यांचे काम रोहित शर्मासारखे नाही आहे. बुमराहला युवराजनं तू जास्त समजुतदार आहे असे सांगितले. यावर बुमराहनं कदाचित तो चष्मा घालतो, म्हणूनच लोकांना असे वाटते.

वाचा-LIVE मॅचमध्ये बिघडलं होतं केदारचं पोट आणि..., हरभजनने सांगितला मजेदार किस्सा

युवराजनं जेव्हा या खेळाविषयी बुमराहला सांगितले तेव्हा त्यानं उत्तर देण्यासाठी 5 सेकंदं मिळतील. यावर बुमराहनं पाच सेकंद का, असे विचारल्यावर युवीनं, तू जास्त समजुतदार आहेस आणि रोहित शर्मा गाढव आहे. युवीच्या तोंडून अचानक असे ऐकल्यानंतर बुमराहने हात वर केले आणि चाहत्यांना सांगितले की, हे मी नाही बोललो आहे.

वाचा-VIDEO : RCBची साथ सोडणार विराट? कॅप्टन कोहलीलं स्वत: दिलं उत्तर

यानंतर, युवराजने बुमराहला एकामागून एक गमतीशीर प्रश्न विचारण्यास सुरवात केली, ज्यामुळे बुमराहला उत्तर देण्यास एका सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला. विशेषत: जेव्हा विराट कोहली की स्विडीश फूटबॉलर लाटन यांपैकी कोणाला फिटनेस आयडल मानतो, असा प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर बुमराहला देता आले नाही. तर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांपैकी एक आवडता फलंदाज कोण? या प्रश्नाचं उत्तरही बुमराहनं दिलं नाही.

वाचा-फॅनच्या इच्छेसाठी महिला खेळाडूनं स्टेडियममध्ये काढला टीशर्ट, सर्वांसमोर केलं किस

याआधी रोहित आणि भज्जीनं सांगितले केदार जाधवचे किस्से

केदार जाधवचा उल्लेख होताच रोहित म्हणाला, 'तो कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही. तो पाच दिवस खेळू शकणार नाही". दरम्यान, जाधव हा आपल्या खराब फिटनेसमुळे चर्चेत असतो. त्याच वेळी भज्जींने जाधवबाबत एक किस्सा सांगितला. यावेळी रोहित शर्मानं हा किस्सा सांगण्यास सुरुवात केली. रोहित म्हणाला की, "सामना सुरू असतानाच केदार जाधवचे पोट बिघडले". यावर हरभजन सिंगने, सामन्याच्या मध्येच केदार जाधवला मैदान सोडावे लागले,कारण त्याचे पोट बिघडले. तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला पोट बिघडलं आहे. त्यावर मी त्याला म्हणालो, सांगायला कशाला आलास जा लवकर". हा किस्सा ऐकल्यानंतर रोहित आणि भज्जी दोघंही पोटधरून हसायला लागले.

First published:

Tags: Cricket, Rohit sharma, Yuvraj singh