नवी दिल्ली, 26 एप्रिल : कोरोनामुळं सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. सामने होत नसल्यामुळं सध्या टीम इंडियाचे खेळाडू सध्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत आहेत. रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांनी नुकताच आपल्या चाहत्यांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी हरभजननं क्रिकेटच्या मैदानावरील मजेदार किस्से सांगितले.
टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंग आणि मर्यादित ओव्हर फॉरमॅटचे उपकर्णधार रोहित शर्मा यांनी इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान अष्टपैलू केदार जाधव यांची खिल्ली उडविली. दरम्यान भज्जी आणि रोहित यांनीही थेट गप्पा मारल्या आणि केदार जाधव कसोटी क्रिकेट का खेळू शकत नाही? हे दोघांनीही स्पष्ट केले. इतर गोष्टींवर चर्चा सुरू असताना या दोघांनी केदार जाधवबाबत बोलण्यास सुरुवात केली.
वाचा-VIDEO : RCBची साथ सोडणार विराट? कॅप्टन कोहलीलं स्वत: दिलं उत्तर
केदार जाधवचा उल्लेख होताच रोहित म्हणाला, 'तो कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही. तो पाच दिवस खेळू शकणार नाही". दरम्यान, जाधव हा आपल्या खराब फिटनेसमुळे चर्चेत असतो. त्याच वेळी भज्जींने जाधवबाबत एक किस्सा सांगितला. यावेळी रोहित शर्मानं हा किस्सा सांगण्यास सुरुवात केली. रोहित म्हणाला की, "सामना सुरू असतानाच केदार जाधवचे पोट बिघडले". यावर हरभजन सिंगने, सामन्याच्या मध्येच केदार जाधवला मैदान सोडावे लागले,कारण त्याचे पोट बिघडले. तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला पोट बिघडलं आहे. त्यावर मी त्याला म्हणालो, सांगायला कशाला आलास जा लवकर". हा किस्सा ऐकल्यानंतर रोहित आणि भज्जी दोघंही पोटधरून हसायला लागले.
वाचा-कोरोनामुळं बदलणार क्रिकेटचे हे नियम? सचिनने दिले संकेत
या दरम्यान भज्जी आणि रोहित यांनी सर्व गोष्टींवर चर्चा केली. भज्जी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आधी रोहितसोबत मुंबई संघात होता. मात्र 2019मध्ये भज्जीने चेन्नईकडून खेळण्यास सुरुवात केली.