Home /News /sport /

VIDEO : फॅनच्या इच्छेसाठी महिला फुटबॉलपटूनं स्टेडियममध्ये काढला टीशर्ट, हजारो लोकांसमोर केलं किस

VIDEO : फॅनच्या इच्छेसाठी महिला फुटबॉलपटूनं स्टेडियममध्ये काढला टीशर्ट, हजारो लोकांसमोर केलं किस

चाहत्याच्या इच्छेमुळे ती पहिल्यांदा थबकली पण त्यानंतर तिने टीशर्ट काढला. चाहत्यानं भरमैदानात तिच्या गालावर किसही केलं होतं.

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : फुटबॉलमध्ये खेळाडूंप्रमाणे चाहत्यांमध्येही  इर्षा असते. यामध्ये खेळाडू आणि चाहते असं काही करतात की ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत होतात. फुटबॉलबद्दल सांगायचं तर या खेळात सामन्यानंतर खेळाडू एकमेकांच्या जर्सीही बदलतात. पुरुषांच्या फुटबॉलमध्ये ही गोष्ट नेहमीच बघायला मिळते. मात्र 2011 मध्ये एका महिला फुटबॉलपटूला भरमैदानात शर्ट काढायला लावला होता. तेसुद्धा कोणत्या खेळाडूने नाही तर एका चाहत्यानं याबाबत विनंती केली. प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये टीशर्ट काढण्याचा हा प्रकार केला होता स्वीडनची फुटबॉलपटू जोसफिन एहकिस्ट हीने. जोसफिनने जर्मनीविरुद्ध एका सामन्यात चाहत्याला टीशर्ट काढून दिला होता. सामना संपल्यानंतर जोसफिन एहकिस्ट स्टँडकडे जात होती. त्यावेळी एका फॅनने टीशर्ट काढला आणि एहकिस्टकडे टीशर्ट मागितला. फॅनने अशी मागणी केल्यानंतर एहकिस्ट पहिल्यांदा थबकली पण त्यानंतर तिने टीशर्ट काढला. एहकिस्टनं त्या जर्मन फॅनचा टीशर्ट घातला. त्यानंतर फॅनने एहकिस्टच्या गालार किसही केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पाहा VIDEO: लपाछपी खेळत असताना वॉशिंग मशिनमध्ये अडकली, तब्बल 3 तासांनी अशी पडली बाहेर जोसफिन एहकिस्ट ही स्वीडनच्या फुटबॉल संघाची खेळाडू होती. तिने 2013 मध्ये निवृत्ती घेतली होती. स्वीडनकडून तिने 80 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. 2011 च्या महिला फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये एहकिस्टनं ब्राँन्झ मेडल जिंकलं होतं. स्वीडनकडून तिने 2 वर्ल्ड कप आणि 2 ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. हे वाचा : कॅनडीयन पंतप्रधानांच्या अदांवर लाखो तरूणी घायाळ, स्लो मोशन मधला VIDEO व्हायरल
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या