नवी दिल्ली, 30 डिसेंबर : 2021 वर्ष संपत आलं आहे आणि अगदी दोन दिवसांत 2022 हे नवीन वर्ष सुरु होईल. सगळेचजण या गेल्या वर्षांतील घटनांवर नजर टाकत आहेत. क्रिकेटप्रेमींनाही सरत्या वर्षातील (Year Ender 2021) अनेक कडू-गोड आठवणी आठवत असतील. क्रिकेट विश्वात 2021 मध्ये भारतीय क्रिकेटप्रेमींना अभिमान वाटतील अशा अनेक घटना घडल्या आहेत. विशेषत: टेस्ट मॅचेसमध्ये भारताची (Team India) कामगिरी खूपच चांगली होती. या कामगिरीत तीन बॅट्समनचं विशेष योगदान आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या तिघांनी गेल्या वर्षभरात अफलातून कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे करिअरमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त सरासरी असलेल्या पुजाराची या वर्षीची सरासरी फक्त 28.08 टक्के इतकीच आहे. तरीही 2021 मध्ये त्याचा समावेश फक्त भारताच्याच नाही तर जगभरातील टॉप-5 बॅट्समनमध्ये करण्यात आला आहे.
इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) 2021 मध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम (Highest Runs In Test ) केला आहे. त्याने या वर्षी 15 टेस्ट मॅचेसमध्ये 61.00 च्या सरासरीनं 1708 रन केले. रुटनं यावर्षी सहा सेंच्युरीही केल्या आहेत. 2021 मध्ये एक हजारपेक्षा जास्त रन करणारा तो एकमेव इंग्लिश बॅट्समन आहे. रुटच्या या दमदार कामगिरीनंतरही इंग्लंडच्या टीमला मात्र चांगलं यश मिळालं नाही. इंग्लंडला 15 पैकी फक्त चार टेस्ट मॅचेसमध्ये विजय मिळवता आला.
वाचा : IND vs SA : सेंच्युरियनमध्ये टीम इंडियाने इतिहास घडवला, विराटसेनेचा दणदणीत विजय
रोहित शर्मा
भारतीय बॅट्समनबद्दल बोलायचं झालं तर सर्वाधिक रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत रोहित शर्मासह तिघांचा समावेश आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या वर्षातील सर्वाधिक यशस्वी बॅट्समन ठरला आहे. त्यानं या वर्षी 47.68 च्या सरासरीनं 906 रन केले. इंग्लंडच्या रुटनंतर रोहित शर्माचे सर्वाधिक रन्स, आहेत.
वाचा : गाब्बा, लॉर्ड्स, ओव्हल सेंच्युरियन, 89 वर्षांमधली टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी
ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा
तर 2021 मध्ये टेस्ट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक यशस्वी बॅट्समनध्ये ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. ऋषभ पंतनं यावर्षी 12 टेस्टमध्ये 748 रन केले तर पुजाराने 14 टेस्टमध्ये 702रन केले आहेत. श्रीलंकेचा दिमुख करुणारत्नेनं 7 मॅचेसमध्ये 69.38 च्या सरासरीनं 902 रन केले. करुणारत्नेची सरासरी टॉप-10 मध्ये सर्वाधिक होती.
विराट कोहली 2021 मध्ये सर्वाधिक टेस्ट रन करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीनं 11 मॅचेसमध्ये 28.21 सरासरीनं 536 रन केले. विराट 2020 या वर्षाप्रमाणेच 2021 मध्येही एकही सेंच्युरी करु शकला नाही. मात्र त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून इतिहास नक्की घडवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rishabh pant, Rohit sharma, Year Ender