मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'युसूफ भाईं'चं जाण सहन करू शकले नाहीत यशपाल, अभिनेत्याच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात घेतला अखेरचा श्वास

'युसूफ भाईं'चं जाण सहन करू शकले नाहीत यशपाल, अभिनेत्याच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात घेतला अखेरचा श्वास

माजी दिग्गज क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांच्या आयुष्यात दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं स्थान सर्वश्रुत आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की त्यांचं करिअर दिलीप कुमार यांच्यामुळे घडलं आहे.

माजी दिग्गज क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांच्या आयुष्यात दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं स्थान सर्वश्रुत आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की त्यांचं करिअर दिलीप कुमार यांच्यामुळे घडलं आहे.

माजी दिग्गज क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांच्या आयुष्यात दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं स्थान सर्वश्रुत आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की त्यांचं करिअर दिलीप कुमार यांच्यामुळे घडलं आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 13 जुलै: माजी भारतीय क्रिकेटर आणि 1983 क्रिकेट विश्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आगे. भारतीय टीममधील माजी मिडल ऑर्डर फलंदाज यशपाल शर्मा यांच्या जाण्यानं भारतीय क्रिकेटचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे. त्यांच्या जाण्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

यशपाल शर्मा यांनी 1983 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात 89 धावांची धमाकेदार खेळी केली होती. ज्यामुळे भारताने पहिल्याच सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली होती. तर विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये त्यांनी इंग्लंडविरोधात 61 धावांची जबरदस्त खेळी केली होती. दरम्यान अशा या दिग्गज खेळाडूचं दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी असणारं कनेक्शनही खास आहे.

दरम्यान यशपाल शर्मा यांच्या आयुष्यात दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं स्थान सर्वश्रुत आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की त्यांचं करिअर दिलीप कुमार यांच्यामुळे घडलं आहे. 1983 वर्ल्ड कपच्या काही वर्ष आधी दिलीप कुमार यांनी एका यशपाल शर्मा यांना भारतीय टीममध्ये घेण्याबाबत शिफारस केली होती. दिलीप कुमार यांना यशपाल शर्मा युसूफ भाई म्हणत असत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अवघ्या काहीच दिवसात यशपाल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या दोन्ही दिग्गजांमध्ये असणारं नातं क्रिकेट आणि बॉलिवूड चाहत्यांना भावनिक करणारं आहे.

हे वाचा-सुरक्षा व्यवस्थेला छेद; नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5लाख रुपयांच्या नोटा गायब

भारताचे माजी बॅट्समन यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांची 1983 च्या वर्ल्ड कप (1983 World Cup) विजयात मोलाची भूमिका राहिली. दिलीप कुमार यांनी आपलशी शिफारस केल्याचं खुद्द यशपाल शर्मा यांनी सांगितलं. 'तुम्ही त्यांना दिलीप साहेब म्हणता, मी युसूफ भाई म्हणतो. त्यांचा एक किस्सा आहे. क्रिकेटमध्ये माझं आयुष्य घडलं ते युसूफ भाईंमुळे,' असं यशपाल शर्मा म्हणाले. यशपाल शर्मा यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतच्या आपल्या भावनिक नात्याबाबत दोन वर्षांपूर्वी द कपिल शर्मा शो मध्ये सविस्तर भाष्य केलं होतं.

दिलीप कुमार यांच्याबद्दल आठवण शेअर करताना यशपाल शर्मा असं म्हणाले होते की, 'मी तेव्हा रणजी प्लेयर होतो. एका कंपनीच्या ग्राऊंडवर नॉक आऊट मॅच सुरू होती, ज्याचे ते अध्यक्ष होते. पहिल्या इनिंगमध्ये मी शतक केलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये 80 च्या आसपास खेळत होतो. तेव्हा काही गाड्या आल्या. मला वाटलं कोणीतरी नेता असेल. मी शतक केलं, त्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवल्या. मॅच संपल्यानंतर स्टेडियममधल्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं तुम्हाला कोणतरी भेटण्यासाठी थांबलं आहे. जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा समोर युसूफ भाई उभे होते. त्यांनी माझ्यासोबत हात मिळवला आणि म्हणाले तुझ्यात दम आहे. तुझ्यासाठी मी कोणाशीतरी बोलेन.'

हे वाचा-1983 वर्ल्डकप जिंकवणाऱ्या माजी क्रिकेटपटूचं निधन, Kapil Dev यांना अश्रू अनावर

दिलीप कुमार यांनी यानंतर यशपाल शर्मांच्या खेळाबाबत राजसिंग डुंगरपूर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी डुंगरपूर बीसीसीआयमध्ये दखल देत होते. दिलीप कुमार यांनीच आपल्याकडे तुझी शिफारस केल्याचं डुंगरपूर यांनी नंतर यशपाल शर्माना सांगितलं. 'पंजाबचा एक मुलगा रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे, मी त्याची बॅटिंग बघून आलो आहे,' असं दिलीप कुमार यांनी डुंगरपूर यांना सांगितलं. यानंतर डुंगरपूर यांनी यशपाल शर्मांबाबत बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

यशपाल शर्मा 1980 च्या दशकात भारताचे प्रमुख आणि विश्वासू बॅट्समनपैकी एक होते. 1983 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 89 रनची खेळी केली होती. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्यांनी 61 रन केले. भारताने या सामन्यात इंग्लंडचा 6 विकेटने पराभव केला आणि यशपाल शर्मा सर्वाधिक रन करणारे खेळाडू होते. याच सामन्यात त्यांनी इंग्लंडचे दिग्गज बॅट्समन एलन लॅम्ब यांना डायरेक्ट हिट मारून रन आऊट केलं होतं.

First published:

Tags: Dilip kumar, Sports