राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था भेदून चोरी; नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब

राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था भेदून चोरी; नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब

Crime in Nashik: भारतीय चलनी नोटा छापण्याच्या टांकसाळीतून (currency note press) 5 लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याची (Rs 5 lakh notes missing) खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक, 13 जुलै: भारतीय चलनी नोटा छापण्याच्या टांकसाळीतून (currency note press) 5 लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याची  (Rs 5 lac  worth notes missing) खळबळजनक घटना समोर आली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था असलेल्या करन्सी नोट प्रेसमधून ही चोरी झाल्यानं प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. एवढी सुरक्षा व्यवस्था असूनही पाच लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्यानं हे पैसे नेमके कुठे गेले असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. याप्रकरणी मुद्रणालय प्रशासकीय यंत्रणेसोबत पोलिसांनीही मौन बाळगलं आहे.

नाशिकमधील संबंधित करन्सी नोट प्रेसमध्ये भारतीय चलनी नोटांची छापाई केली जाते. याठिकाणी वर्षासाठी दोन ते अडीच हजार दशलक्ष किमतीच्या नोटा छापल्या जातात. त्यामुळे या कारखान्याला अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर याचं कारखान्यात दिवसरात्र छापाई करून देशातील नागरिकांना नोटा पुरवण्यात आल्या होत्या. आता याच मुद्रणालयात चोरीचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे मुद्रणालय व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, विधानसभा उपाध्यक्षांनीही दिले नाशिक पोलिसांना आदेश

छपाईच्या कारखान्यातून चलनी नोटा गायब झाल्यानं मागील काही काळापासून गोपनीयरीत्या विभागीय चौकशी सुरू होती. पण सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. ही घटना राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्यानं संबंधित मुद्रणालय प्रशासन आणि पोलिसांनी मौन बाळगलं आहे.

Published by: News18 Desk
First published: July 13, 2021, 10:14 AM IST

ताज्या बातम्या