मुंबई, 12 जून : लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पारपडली. यासामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. सामना संपल्यावर आयसीसीकडून स्लो ओव्हर रेटमुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच भारताचा युवा गोलंदाज शुभमन गिलला देखील त्याच्या वादग्रस्त कॅच संदर्भातील वक्तव्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला हरवल्यानंतर ऑस्ट्रेलिया आता आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारी पहिली टीम ठरली आहे. त्यांनी आतापर्यंत वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अशा सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत. आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया आय दोन्ही संघांवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली आहे. टीम इंडियाने निर्धारित वेळेपेक्षा 5 ओव्हर कमी टाकली तर ऑस्ट्रेलियाने 4 ओव्हर कमी टाकली होती. त्यामुळे आयसीसीच्या नियम क्रमांक 2.22 नुसार प्रत्येक ओव्हरला 20 टक्के मॅच फी ही कापली जाते. WTC Final : ऑस्ट्रेलियाने WTC ट्रॉफी जिंकून घडवला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव संघ कारवाईनंतर टीम इंडियाची 100 टक्के मॅच फी तर ऑस्ट्रेलियाची 80 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा एकही रुपया मिळणार नाही. याशिवाय भारताचा स्टार युवा क्रिकेटर शुबमन गिल याच्यावरही आयसीसीकडून कारवाई करण्यात आली आहे.
लंडन येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या दिवशी भारताच्या फलंदाजीचा दुसरा डाव सुरु असताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामी फलंदाज म्हणून मैदानात आले. पण यावेळी कॅमरुन ग्रीनने शुभमनचा कॅच पकडल्यामुळे त्याची विकेट पडली. केवळ 18 धावा करून तो माघारी परतला. परंतु ग्रीनने पकडलेली ही कॅच वादग्रस्त ठरली आणि गिलला बाद करण्याचा अंपायरचा निर्णय हा चुकीचा असल्याचे टीम इंडियाच्या चाहत्यांनी म्हंटले. यावर मॅच संपल्यावर शुभमनने देखील ट्विट करत वक्तव्य केले. परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यात एकदा अंपायरचा निर्णय आल्यावर खेळाडूने असे करणे हे आयसीसीच्या नियम क्रमांक 2.7 नुसार चुकीचे आहे. तेव्हा या चुकीबद्दल गिलला मॅच फीसच्या 15 टक्के दंड भरावा लागणार आहे. म्हणजे गिलला आता एकूण मॅच फीच्या 115 टक्के दंड भरावा लागेल.