मुंबई, 11 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनल सामन्यात भारताला 209 धावांनी पराभूत करून इतिहास घडवला असून आता ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा एकमेव संघ ठरला आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यावर सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा मोठा स्कोअर उभा केला. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्यांनी 270 धावा केल्या. तर याच्या समोर भारताचा संघाने फलंदाजी करताना पहिल्या डावात केवळ 296 तर दुसऱ्या डावात 234 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीत देखील चांगले प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली 2023 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. 2023 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर टीम ऑस्ट्रेलिया आता आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा एकमेव संघ ठरला आहे. WTC Final : ICC स्पर्धेत पुन्हा टीम इंडियाची निराशा,ऑस्ट्रेलिया बनली वर्ल्ड चॅम्पियन्स ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या आयसीसी स्पर्धा खालील प्रमाणे, वन डे वर्ल्डकप - 1987, कर्णधार - एलन बॉर्डर वन डे वर्ल्डकप - 1999, कर्णधार - स्टीव्ह वॉ वन डे वर्ल्डकप - 2003, कर्णधार - रिकी पॉन्टिंग चॅम्पियन्स ट्रॉफी - 2003, कर्णधार - रिकी पॉन्टिंग वन डे वर्ल्डकप - 2007, कर्णधार - रिकी पॉन्टिंग चॅम्पियन्स ट्रॉफी - 2009, कर्णधार - रिकी पॉन्टिंग वन डे वर्ल्डकप - 2015, कर्णधार - मायकल क्लार्क टी-20 वर्ल्डकप - 2021, कर्णधार - एरॉन फिंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप - 2021-123, कर्णधार - पॅट कमिन्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.