WTC Final : विराट कोहलीसमोर आहेत 3 मुख्य प्रश्न, योग्य उत्तरं शोधली तर मिळणार विजेतेपद

WTC Final : विराट कोहलीसमोर आहेत 3 मुख्य प्रश्न, योग्य उत्तरं शोधली तर मिळणार विजेतेपद

न्यूझीलंड विरुद्धची ऐतिहासिक फायनल (WTC Final 2021) जिंकण्यासाठी टीम इंडियानं जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या फायनलपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) तीन प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) आता एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. ही ऐतिहासिक फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियानं जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या फायनलपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) तीन प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.

गिल की मयंक?

रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) टीम इंडियाच्या इनिंगची सुरुवात कोण करणार?  हा विराटसमोरचा मुख्य प्रश्न असेल. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुभमन गिल (Shubman Gill)  हे दोन पर्याय विराटसमोर आहेत. मयंकच्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलला संधी देण्यात आली होती. गिलने पदार्पणातील ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. मात्र त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याला कमाल करता आली नव्हती. या टेस्ट सीरिजमध्ये गिलने 19.83 च्या सरासरीने फक्त 119 रन केले होते. तसेच आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही गिलची कामगिरी साधरण होती.

गिलच्या खराब फॉर्ममुळे मयंक अग्रवालला पुन्हा संधी देण्याबाबत विराट कोहली विचार करु शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मयंक टीम इंडियाचा नियमित ओपनिंग बॅट्समन होता.

जडेजा की अश्विन?

टीम इंडियाचे संतुलन राखण्यासाठी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोघांचा समावेश नक्की मानला जात आहे. बॉलिंग प्रमाणेच बॅटींगमध्येही हे अनुभवी खेळाडू उपयुक्त आहेत. मात्र साऊथम्पटनचं हवामान आणि पिच फास्ट बॉलिंगला मदत करणारी आहे. न्यूझीलंडची टीमही याच कारणामुळे फायनलमध्ये 4 फास्ट बॉलर्सना घेऊन खेळणार हे नक्की आहे. टीम इंडियाकडेही इशांत, शमी, बुमराह आणि सिराज हे चार अव्वल फास्ट बॉलर्स आहेत. त्यामुळे या चौघांना खेळवण्यासाठी जडेजा आणि अश्विन यापैकी कुणाची निवड करावी हा विराटसमोरचा दुसरा प्रश्न आहे.

IND vs SL : ‘या’ दोन खेळाडूंवर अन्याय, श्रीलंका दौऱ्यासाठी निवड समितीनं केलं दुर्लक्ष

इशांत की सिराज?

जडेजा आणि अश्विन या दोघांनाही अंतिम 11 मध्ये संधी दिली तर विराट कोहलीसमोर तिसरा मुख्य प्रश्न आहे. अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि तरुण फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यापैकी कुणाची निवड करायची या प्रश्नाचे उत्तर विराटला शोधावे लागणार आहे.

सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो सातत्याने चांगली बॉलिंग करत आहे. तर दुसरिकडे इशांत शर्माकडे इंग्लंडमधील 12 टेस्टसह 101 टेस्टचा अनुभव आहे. या अनुभवाकडे दुर्लक्ष करणे मॅनेजमेंटसाठी अवघड आहे. त्यामुळे या दोघांमध्ये एकाची निवड करणे विराटसाठी डोकेदुखी असणार आहे.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 8:54 AM IST

ताज्या बातम्या