IND vs SL : ‘या’ दोन खेळाडूंवर अन्याय, श्रीलंका दौऱ्यासाठी निवड समितीनं केलं दुर्लक्ष

IND vs SL : ‘या’ दोन खेळाडूंवर अन्याय, श्रीलंका दौऱ्यासाठी निवड समितीनं केलं दुर्लक्ष

श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) दौऱ्यासाठी निवड समितानं 20 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. या टीममध्ये देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएल गाजवणाऱ्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 11 जून :  श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितानं 20 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) व्हाईस कॅप्टन असेल. पाच नेट बॉलर्सचा देखील टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अद्याप फिट नसल्यानं त्याचा श्रीलंका दौऱ्यासाठी विचार करण्यात आलेला नाही. तर जयदेव उनाडकत (Jaydev Unadkat) आणि राहुल तेवातिया (Rahul  Tewatia) यांची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. भारताने इंग्लंड दौऱ्यावरही 20 सदस्यांची टीम पाठवली आहे.  याचा अर्थ देशातील टॉप 40 खेळाडूंमध्ये उनाडकत आणि तेवातिया यांचा समावेश नाही.

उनाडकतला संधी नाही

जयदेव उनाडकतनं 2010 साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने सात वन-डे आणि 10 टी 20 मॅचमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचा 2018 नंतर टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. उनाडकतचा फर्स्ट क्लास आणि टी 20 क्रिकेटमध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे.

त्याने 89 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 327 तर 150 टी 20 मॅचमध्ये 182 विकेट्स घेतल्या आहेत. 2019-20 च्या रणजी सिझनमध्ये त्याने 67 विकेट्स घेतल्या होत्या. सौराष्ट्रच्या रणजी विजेतेपदाचा तो शिल्पकार होता.  राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांनी उनाडकतच्या जागी चेतन सकारियावर विश्वास दाखवला आहे.

टीम इंडियामध्ये 6 नव्या खेळाडूंचा समावेश, विराट-धोनीच्या विश्वासूंना संधी

तीन महिन्यांपूर्वी झाला होता तेवातियाचा समावेश

आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर राहुल तेवातियाने जोरदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले होते. तेवातियाचा यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. त्यावेळी त्याला एकदाही संधी मिळाली नाही. त्यानंतर या आयपीएल सिझनमध्ये त्याची कामगिरी साधारण होती. पहिल्या सात मॅचमध्ये तेवातियाला फक्त 2 विकेट्स मिळवण्यात यश मिळाले होते. या साधारण कामगिरीचा फटका तेवातियाला बसला आहे.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 8:34 AM IST

ताज्या बातम्या