मुंबई, 18 मार्च : महिला वर्ल्ड कपमध्ये (Women's World Cup 2022) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं बांगलादेशचा पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये (West Indies Women vs Bangladesh Women) वेस्ट इंडिजनं 4 रननं विजय मिळवला. वेस्ट इंडिजचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा फटका टीम इंडियाला (Team India Women) बसला आहे.
वेस्ट इंडिजनं आता तीन विजयासह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर टीम इंडियाची तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय टीमनं वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 4 सामने खेळले असून त्यामध्ये दोन विजय तर दोन पराभव सहन केले आहेत. भारतीय टीमकडं चार पॉईंट्स आहेत. आता तिसरा क्रमांक पुन्हा मिळवण्यासाठी टीमला शनिवारी होणारी ऑस्ट्रेलिया विरूद्धची मॅच जिंकावी लागेल.
महिला वर्ल्ड कपमधील 17 मॅचनंतर ऑस्ट्रेलियन टीम चार मॅचमध्ये 4 विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेनंही सर्व चार मॅच जिंकल्या आहेत. पण त्यांचा रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा थोडा कमी असल्यानं ही टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 6 पॉईंट्ससह वेस्ट इंडिज तिसऱ्या तर 4 पॉईंट्ससह टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे. यजमान न्यूझीलंडचेही चार पॉईंट्स आहेत. पण त्यांचा रनरेट कमी असल्यानं ही टीम सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड, बांगलादेश आणि पाकिस्तान या टीम अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत.
Women's World Cup : जखमी हरमनप्रीत ऑस्ट्रे्लिया विरूद्ध खेळणार का? स्मृतीनं दिलं अपडेट
भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्ध मॅच बाकी आहेत. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित 3 पैकी 2 मॅच जिंकणे आवश्यक आहे. जर टीम इंडियानं 3 पैकी 2 सामने गमावले तर टॉप 4 मध्ये येण्याची शक्यता कमी होईल. त्या परिस्थितीमध्ये सध्या चारपैकी एक मॅच जिंकलेल्या इंग्लंडला संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय टीमला सेमी फायनला प्रवेश निश्चित करण्यासाठी आणखी किमान दोन सामने चांगल्या रनरेटनं जिंकणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.