मुंबई, 18 मार्च : महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup 2022) टीम इंडियाची पुढील लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी (India women vs Australia Women) होणार आहे. भारतीय टीमची या वर्ल्ड कपमधील वाटचाल संमिश्र ठरली आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताने 4 पैकी 2 सामने सहज जिंकले. तर 2 सामन्यात मोठा पराभव सहन करावा लागला. इंग्लंड विरूद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. इंग्लंड विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये भारतीय टीमची व्हाईस कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) जखमी झाली होती. त्यामुळे ती ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हरमन जखमी झाल्यानं टीम इंडियाच्या काळजीच भर पडलीय. कारण या स्पर्धेत हरमन चांगलीच फॉर्मात आहे. तिने न्यूझीलंड विरूद्ध अर्धशतक तर वेस्ट इंडिज विरूद्ध शतक झळकावले होते. टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) हरमनच्या फिटनेसचं अपडेट दिलं आहे. ‘हरमनप्रीत कौर संपूर्ण फिट आहे. ती ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल,’ असे स्मृतीनं जाहीर केले आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत शनिवारी ऑकलंडमध्ये होणार आहे. 2017 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्या सेमी फायनलमध्ये हरमननं 171 रनची ऐतिहासिक खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाची महिला टीम या स्पर्धेत फॉर्मात आहे. या टीमनं आत्तापर्यंतच्या सर्व 4 मॅच जिंकल्या आहेत. Women’s World Cup : 140 रन केल्यानंतरही वेस्ट इंडिज विजयी, बांगलादेशचा केला थरारक पराभव भारतीय टीमला कॅप्टन मिताली राजच्या (Mithali Raj) फॉर्मची चिंता आहे. या वर्ल्ड कपमध्ये मिताली राजला आजवर एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. मितालीनं पाकिस्तान विरूद्ध 9 , न्यूझीलंड विरूद्ध 31 तर वेस्ट इंडिज विरूद्ध फक्त 1 रन केला होता. इंग्लंड विरूद्धही तिला दोन अंकी रन करण्यात अपयश आलं. या खराब फॉर्मनंतर अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामीनं (Jhulan Goswami) मितालीचा बचाव केला आहे. ’ मिताली चांगल्या खेळीपासून फक्त एक इनिंग दूर आहे. तिने मागील सीरिजमध्येही चांगली बॅटींग केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये ती जबरदस्त फॉर्मपासून एक पावलाच्या अंतरावर आहे.’ असे झूलनने इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर सांगितले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







