Home /News /sport /

VIDEO: हवेत उडी मारत Ashleigh Gardner ने एका हातात पडकला सुपर-डुपर कॅच, बॅट्समनही झाली खूश

VIDEO: हवेत उडी मारत Ashleigh Gardner ने एका हातात पडकला सुपर-डुपर कॅच, बॅट्समनही झाली खूश

Ashleigh Gardner

Ashleigh Gardner

एखादा बॅट्समन झेलबाद झाला तर त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते. पण, आयसीसी महिला विश्वचषक 2022 (Women’s World Cup-2022) मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेची फलंदाज मिग्नॉन डु प्रीझ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (AUS-W vs SA-W)झेलबाद झाली तेव्हा तिला आनंद झाला. तिच्या आनंदाचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅशले गार्डनरने पकडलेला एकहाती कॅच.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 22 मार्च: एखादा बॅट्समन झेलबाद झाला तर त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते. पण, आयसीसी महिला विश्वचषक 2022 (Women’s World Cup-2022) मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेची फलंदाज मिग्नॉन डु प्रीझ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (AUS-W vs SA-W)झेलबाद झाली तेव्हा तिला आनंद झाला. तिच्या आनंदाचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅशले गार्डनरने पकडलेला एकहाती कॅच. ऑस्ट्रेलियन अॅशले गार्डनरने कॅच पकडण्यासाठी केलेला प्रयत्न पाहून सर्वत्र तिचे कौतुक सुरु आहे. असे कॅच क्वचितच पाहायला मिळतात. आणि महिला क्रिकेटमध्ये फार कमी. सध्याच्या महिला विश्वचषकात अनेक चकित करणारे कॅच पाहायला मिळाले, ज्यामध्ये गार्डनरचा कॅच अग्रस्थानी आहे. विशेष म्हणजे, तिचा हा कॅच पाहून आऊट झालेली बॅट्समन भलतीच खूश झाली आहे. ती हसत हसत माघारी परतली. वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शानदार फलंदाजी करताना 5 विकेट गमावत 271 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाने 45.2 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार मेग लॅनिंगने 135 धावांचे शतक झळकावले आणि ती नाबाद परतली. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर लॉरा वॉल्व्हर्टने सर्वाधिक 19 धावांचे योगदान दिले. मात्र, तिचे शतक 10 धावांनी हुकले. दरम्यान, मिग्नॉन डू प्रीझ (14) या अॅशले गार्डनरचा डाव एका हाताने आश्चर्यकारक झेल देऊन संपुष्टात आला. तिच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 46 वे षटक सुरू होते. ऑस्ट्रेलियाकडून जेस जॉन्सन गोलंदाजी करत होती. मिग्नॉन डू प्रीझने त्याच्या बॉलवर डीप-मिड विकेटवर हवाई शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॉल सीमारेषेबाहेर जाण्याऐवजी हवेत झेपावला. त्यावेळी गार्डनर सीमा रेषेजवळ उपस्थित होती. काही पावले मागे धावत तिने हवेत उडी मारली आणि तो अशक्य कॅच एका हाताने पकडला. तिचा हा प्रयत्न पाहून मिग्नॉन डू प्रीझही चकित झाली. झेलबाद झाल्यामुळे नाराज न होती तिच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं. यावरून असे लक्षात आले की तीला आउट झाल्याचे दुःख काहीच वाटलं नाही. ICC Women's World Cup: पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने ऐतिहासिक विजयाचे छोट्या परीसोबत केले सेलिब्रेशन, VIDEO  झालेल्या या सामन्यात गार्डनरनेही बॉलींग केली. 10 षटकात 52 धावा देत तिने एक विकेट घेतली. ही विकेट वॉलवॉर्टची होती, तिला जर थोडा वेळ क्रिजवर खेळवले असते तर दक्षिण आफ्रिकेला 300 धावा करणे सोपे झाले असते. ती शतकाच्या अगदी जवळ होती. पण गार्डनरने वॉलवॉर्टला 90 धावांवर बाद केले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Australia, Cricket news

    पुढील बातम्या