जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अमेरिकेचा संघ पण सगळेच भारतीय, खेळाडु ते निवड समितीही भारतीयच

अमेरिकेचा संघ पण सगळेच भारतीय, खेळाडु ते निवड समितीही भारतीयच

अमेरिकेचा संघ पण सगळेच भारतीय, खेळाडु ते निवड समितीही भारतीयच

महिलांच्या अंडर 19 वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे. यासाठी अमेरिकेने त्यांच्या महिला संघाची घोषणा केलीय. पण यात सर्वच 15 खेळाडू हे भारतीय आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर : ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं पटकावणारा अमेरिका आता क्रिकेट जगतात नाव कमावण्यासाठी धडपड करत आहे. सध्या महिलांच्या अंडर 19 वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे. यासाठी अमेरिकेने त्यांच्या महिला संघाची घोषणा केलीय. पण यात सर्वच 15 खेळाडू हे भारतीय आहेत. यातील बहुतांश क्रिकेटर्सनी स्थानिक क्लबमध्ये क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आहे. आयसीसी अंडर 19 महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कपचे पहिल्यांदाच आयोजन केलं जात आहे. 14 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यात अमेरिकेच्या क्रिकेट संघाचाही सहभाग असेल. अमेरिकेच्या अंडर 19 महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व गितिका कोडालीकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी अनिक कोलनकडे असणार आहे. हेही वाचा :  अर्जुनच्या शतकावर सचिनची प्रतिक्रिया, म्हणाला,‘प्रत्येक बापाला वाटत असतं की…’ अमेरिकेच्या संघात यष्टीरक्षक पूजा गणेश, आदिती चुडास्मा, भूमिका बद्रीराजू, दिशा ढिंग्रा, इशानी वाघेला जीवना अरस, लास्य मुल्लापुडी, पूजा शाह, रितू सिंह, साई तन्मयी अईयुन्नी, स्निग्धा पॉल, सुहानी थडानी, तरनम चोप्रा यांचा समावेश आहे. याशिवाय राखीव पाच खेळाडू असणार आहे. संघाचे प्रशिक्षक वेस्ट इंडिजचे शिवनारायण चंद्रपॉल हेसुद्धा भारतीय वंशाचे आहेत. तर संघाचे एनालिस्ट रोहन गोसला आणि निवड समितीसुद्धा भारतीय आहे. तर अध्यक्ष रितेश काडू हे आहेत. महिला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये अमेरिकेचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. याआधी 2010 मध्ये पुरुषांच्या अंडर 19 क्रिकेट टीमने टी20 स्पर्धा खेळली होती. संघाचे प्रशिक्षक चंद्रपॉल म्हणाले की, आम्ही अमेरिकेत सध्या असलेल्या सर्वोत्तम खेळाडुंसोबत पहिल्यांदा आय़ोजित होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये आम्ही उतरत आहे. आमच्या संघाने एक वर्ष मेहनत घेतली आहे. हेही वाचा :  रोनाल्डोला बेंचवर बसवलेल्या पोर्तुगालच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, FPFने दिली माहिती आम्ही वर्ल्ड कपमधील सर्वात नवी टीम आहे पण आमचा प्रयत्न हा सर्वोत्तम कामगिरी करण्याकडे असेल असंही चंदरपॉल यांनी म्हटलं. आयसीसी अंडर १९ महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये १६ संघ ४ गटात भाग घेतली. अमेरिका ग्रुप ए मध्ये खेळेल. यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि बांगलादेशसोबत असणार आहे. अमेरिका पहिला सामना १४ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात