जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रोनाल्डोला बेंचवर बसवलेल्या पोर्तुगालच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, FPFने दिली माहिती

रोनाल्डोला बेंचवर बसवलेल्या पोर्तुगालच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, FPFने दिली माहिती

रोनाल्डोला बेंचवर बसवलेल्या पोर्तुगालच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, FPFने दिली माहिती

सांतोस यांची चर्चा रोनाल्डोना दोन सामन्यात स्टार्टिंग ११ मध्ये न घेतल्याने झाली होती. यामुळे सांतोस यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये पोर्तुगालच्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये मोराक्कोविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह पोर्तुगालचा फिफा वर्ल्ड कपमधील प्रवास संपुष्टात आला. यानंतर आता पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली. क्वार्टर फायनलमध्ये पोर्तुगालला मोराक्कोविरुद्ध ०-१ पराभूत व्हावं लागलं होतं. सांतोस यांची चर्चा रोनाल्डोना दोन सामन्यात स्टार्टिंग ११ मध्ये न घेतल्याने झाली होती. यामुळे सांतोस यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. सांतोस यांनी २०१४ मध्ये पोर्तुगालच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक पद स्वीकारले होते. त्यांच्या कार्यकाळात १०९ सामने खेळले होते. यामध्ये ७६ विजय, २३ ड्रॉ आणि २३ सामन्यात पराभव झाला. हेही वाचा :  मेस्सीचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट अन् महागड्या कार; किती आहे संपत्ती? सांतोस यांच्या कार्यकाळात पोर्तुगालची विजयाची टक्केवारी ६१.१४ इतकी होती. पोर्तुगालने त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकदा युरो चॅम्पियशिपचं विजतेपेद पटकावलं. यानतंर वर्ल्ड कप आणि युरो कपमधून राउंड १६ मधून बाहेर पडावं लागलं होतं. तर यंदा वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. रोनाल्डोसारख्या स्टार फुटबॉलपटूला फिफा वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाच्या टप्प्यावर प्रशिक्षकांनी बेंचवर बसवलं. त्याला स्टार्टिंग इलेव्हनमध्ये घेतलं नाही. यामुळे जगभरातून फुटबॉल चाहत्यांनी प्रशिक्षक सांतोस यांच्या निर्णयावर निशाणा साधला होता.दरम्यान,  सांतोस यांनी आपला निर्णय योग्य होता असं स्पष्ट केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात