नवी दिल्ली, 01 डिसेंबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या रागीट स्वभावामुळे ओळखला जातो. मात्र कर्णधार झाल्यापासून विराटच्या या स्वभावात बदल झाला आहे. असे असले तरी, , काही दिवसांपूर्वी भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देत पुन्ह आपल्या रागीट स्वभावाचे दर्शन दिले. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनिअर यांनी वर्ल्ड कपमध्ये भारतीय निवड समितीवर टीका केली होती. फारूख यांनी सिलेक्टर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला सेवा देत चहा देण्यात व्यस्त होते, असा गंभीर आरोप केला होता. यावर अनुष्का शर्मानं ट्वीटरवर वरुन खरपूस समाचार घेतला होता. मात्र आता विराटनं आपल्या अंदाजात फारूख इंजिनिअर यांच्यावर टीका केली आहे. वाचा- भारताच्या कर्णधाराची लव्हस्टोरी, जेव्हा समजलं ती प्रशिक्षकाची मुलगी आहे तेव्हा.. इंडिया टुडेनं आयोजित एका कार्यक्रमात विराटनं, “ “तुम्हाला निवड समितीबद्दल टीका करायची तर जरुर करा, पण अनुष्काचं नाव घेण्यात काय अर्थ आहे? ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. म्हणजे तिचं नाव घेतलं की आपण चर्चेत येतो, म्हणूनच घेतले जाते”, असे उत्तर दिलं. तसेच, अनुष्कावर केलेल्या आरोपांवर उत्तर देत, “वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना पाहण्यासाठी अनुष्का आपल्या दोन मैत्रिणींसोबत आली होती. या सामन्यात परिवारासाठी आणि निवड समितीसाठी बसण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळं तिच्या प्रसिध्दीसाठी तिचे नाव घेण्यात काही अर्थ नाही”, असे सांगितले. वाचा- शरद पवारांशी पंगा घेणं ऑस्ट्रेलियाच्या संघालाही पडलंय महागात, पाहा VIDEO अनुष्का शर्मानं टीकाकारांना दिले होते सडेतोड उत्तर फारूख इंजिनिअर यांनी केलेल्या आरोपावर अनुष्का शर्मा ट्वीट करत सडेतोड उत्तर दिले होत. अनुष्कानं आपल्या ट्वीटमध्ये सतत लोक खोट्याला खरे मानतात असे सांगितले. त्यावर टीकाकारांची शाळा घेत, “मी माझ्या करिअरमध्ये अनेक वादांवर शांत राहिले आहे. मात्र माझ्यावर निवड समितीन माझी सेवा केली, मला चहा दिला, असा आरोप करण्यात आला. पण मी वर्ल्ड कपमध्ये फॅमिली बॉक्समध्ये होते. तुम्हाला जर निवड समितीवर टीका करायची आहे, तर माझं नाव घेऊ नका. आणि मुळात मला चहा आवडत नाही मी कॉफी पिते”, असे म्हणत टीकाकारांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. वाचा- कर्णधाराच्या निर्णयाचा आणखी एक बळी; सर्वांना आठवला राहुल द्रविड!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







