जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कर्णधाराच्या निर्णयाचा आणखी एक बळी; सर्वांना आठवला राहुल द्रविड!

कर्णधाराच्या निर्णयाचा आणखी एक बळी; सर्वांना आठवला राहुल द्रविड!

कर्णधाराच्या निर्णयाचा आणखी एक बळी; सर्वांना आठवला राहुल द्रविड!

वॉर्नरला कसोटी क्रिकेटमधील एका महाविक्रमावर नाव कोरण्याची संधी होती आणि ही संधी केवळ कर्णधारामुळे गमवावी लागली.

  • -MIN READ
  • Last Updated :

अ‍ॅडलेट, 30 नोव्हेंबर: पाकिस्तानविरुद्धच्या डे-नाईट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने त्रिशतकी खेळी करत ऐतिहासिक खेळी केली. वॉर्नरने पहिल्या डावात 418 चेंडूत 39 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 335 धावा केल्या. या खेळीसह वॉर्नरने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. पण क्रिकेटमधील अशी ऐतिहासिक खेळी करून देखील वॉर्नर निराश आहे. कारण वॉर्नरला कसोटी क्रिकेटमधील एका महाविक्रमावर नाव कोरण्याची संधी होती आणि ही संधी केवळ कर्णधारामुळे गमवावी लागली. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावल्यानंतर वॉर्नरने आक्रमक खेळ सुरु केला. तो जेव्हा 335 धावांवर खेळत होता. तेव्हाच कर्णधार टीम पेन याने 127व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव 3 बाद 589 धावांवर घोषित केला. टीम पेन याने जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की तो असा काही निर्णय घेईल. कारण वॉर्नरकडे कसोटीमधील सर्वाधिक 400 धावाांचा विक्रम मोडण्याची संधी होती. हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा याच्या नावावर आहे. पेनच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळेच वॉर्नर जेव्हा ऐतिहासिक कामगिरी करून मैदानातून बाहेर पडत होता तेव्हा त्याचा चेहरा उदास होता. निर्णयावर सोशल मीडियावर युझर्सकडून पेनला ट्रोल केले जात आहे. 519 मिनिटे केली बॅटिंग; ब्रॅडमन यांनी ही करता आली नाही अशी कामगिरी! आठवण झाली द्रविडची… टीम पेनच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना इतिहासातील राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर वादाची आठवण आली. 2004मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. पहिला कसोटी सामना 28 मार्च रोजी मुल्तान येथे सुरु झाला. या सामन्यात विरेंद्र सेहवागने त्रिशतक झळकावले होते. सेहवागच्या या शतकामुळे ही कसोटी सर्व क्रिकेटच्या चाहत्यांना लक्षात आहे. पण त्याच बरोबर या सामन्यात कर्णधार द्रविडने घेतलेला वादग्रस्त निर्णय देखील कोणी विसरणार नाही. भारतीय क्रिकेटमधील पहिली डबल हॅट्रिक; पाहा VIDEO द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सेहवागने 309 धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने 5 बाद 675 धावा केल्या होत्या. तेव्हा सचिन द्विशतकापासून केवळ 6 धावा दूर होता आणि द्रविडने भारतीय संघाचा डाव घोषित केला. सचिन झाला नाराज कर्णधार द्रविडच्या या निर्णयावर सचिन नाराज होत मैदानाबाहेर आला होता. मैदानात शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या सचिनच्या चेहऱ्यावरील राग सर्वांनी पाहिला होता. या निर्णयामुळे सचिन अनेक दिवस द्रविडशी बोलला नव्हता. द्रविडचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. पण या दोन्ही खेळाडूंनी त्यावर सार्वजनिक भाष्य केले नाही. टीम पेनने घेतलेल्या आज घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना राहुल द्रविडच्या निर्णयाची आठवण झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात