मुंबई, 01 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण सेना भाजपमध्ये बिनसल्यानंतर ऐतिहासिक महाआघाडी स्थापन होऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी अनेक नाट्यमय घडामोडी राज्याच्या राजकारणात घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लावून शिवसेना आणि काँग्रेस या दोन टोकाच्या विचारसरणी असलेल्या पक्षांना आघाडीत एकत्र आणलं. त्याआधी निवडणूक प्रचारादरम्यान पवारांवर अनेकवेळा टीका करण्यात आली. यामध्ये पातळी सोडूनही टीका केली गेली. त्यावर शरद पवार यांनीही त्यांच्या शैलीत खास समाचार घेतला. राज्यात निवडणूक प्रचारावेळी भाजपकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर शरसंधान केलं गेलं. देवेंद्र फडणवीस यांनी तर शरद पवार यांच्या काळ संपला असंही म्हटलं होतं. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी भाजप प्रवेश केला होता. यात साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांचाही समावेश होता. त्यांच्याविरुद्ध साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारावेळी पावसात शरद पवार यांनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील वातावरणच बदलून टाकलं. फडणवीस समोर पैलवानच नसल्याचे वारंवार बोलून दाखवत होते. पण शरद पवार यांनी राजकीय अनुभवाच्या जोरावर आपणही पैलवान नाही तर वस्ताद असल्याचं सिद्ध करून दाखवलं. हे करताना त्यांनी भाजपला महाराष्ट्रात सत्तेबाहेर ठेवून दिलेल्या दणक्याची चर्चा होत आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपची किंवा विरोधकांची अधोगती सुरू झाली. फक्त राजकीय विरोधकांनाच नाही तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघालाही शरद पवार यांना धक्का देणं महागात पडलं आहे.
फक्त राजकारणातच नाही तर पवारांनी क्रीडा क्षेत्रातही अनेक पदं भूषवली आहेत. बीसीसीआय आणि आयसीसीच्या अध्यक्षपदीही शरद पवार होते. आयसीसीचे अध्यक्ष असताना 2006 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शरद पवारांसोबत बेशिस्त वर्तन केलं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती. तेव्हाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
— Vithoba Corleone (@DonJuannabe) November 27, 2019
शरद पवार यांच्यावर टीका करताना काहींनी हा व्हिडिओ शेअर करताना ऑस्ट्रेलियाच्या कृत्याचं समर्थन केलं आहे. तर यावर पवार समर्थकांनी ऑस्ट्रेलियाच्या या कृतीनंतर त्यांचे दिवस कसे फिरले हे सांगितलं आहे.
2006 नंतर 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. याशिवाय आयपीएलसारख्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विकत घेऊन त्यांची नाचक्कीच केली असंही म्हटलं आहे.