मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, MI vs RR: ...अन् पांड्याने मैदानातच घेतला इशानचा किस; Video तुफान व्हायरल

IPL 2021, MI vs RR: ...अन् पांड्याने मैदानातच घेतला इशानचा किस; Video तुफान व्हायरल

...अन् पांड्याने मैदानातच घेतला इशानचा किस; Video तुफान व्हायरल

...अन् पांड्याने मैदानातच घेतला इशानचा किस; Video तुफान व्हायरल

IPL 2021, MI vs RR: गेल्या काही सामन्यात चांगलं प्रदर्शन न करू शकलेल्या मुंबई संघाने या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार कामगिरी करत 8 विकेट्सने सामना खिशात घातला. या दरम्यान इशानच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: मुंबई इंडियन्सने मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध (rajasthan royals vs mumbai indians) कमालीची खेळी केली. गेल्या काही सामन्यात चांगलं प्रदर्शन न करू शकलेल्या मुंबई संघाने या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार कामगिरी करत 8 विकेट्सने सामना खिशात घातला. या सामन्याचा हिरो युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan performance in IPL 2021) ठरला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने इशानने हे अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये संघ सहकारी हार्दिक पांड्या (Hardik Pandya Kisses Ishan Kishan) त्याला किस करताना दिसत आहे.

हे वाचा- RCB vs SRH, Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं नशीब

मैदानात इशानला किस देण्यासारखं घडल तरी काय?

झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर केवळ 90 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डॉ कॉकऐवजी इशान किशन सलामीला फलंदाजीला आला होता. त्याने डावाअखेर नाबाद राहत 25 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे केवळ 8.2 ओव्हर्समध्ये मुंबईला सामना जिंकण्यात यश आले होते.

हे वाचा-IPL 2021: धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबतची मोठी बातमी! CSK मॅनेजमेंटनं केला खुलासा

त्यातही डावातील नववी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या मुस्तफिजुर रेहमानच्या पहिल्या चेंडूवर त्याने जबरदस्त चौकार मारला होता. त्यानंतर संघाला विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता होती. अशावेळी त्याने पुढील चेंडूवर शानदार सिक्स खेचला आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या अप्रतिम शॉटला पाहून नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या हार्दिकने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याच्या डोक्यावर किस करत त्याला शाबासकी दिली.

यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरत असलेल्या इशानला अशाप्रकारे पुनरागमन करताना पाहून डगआऊटमध्ये बसलेला कर्णधार रोहितही संतुष्ट दिसला. त्याने इशानने विजयी षटकार मारल्यानंतर टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले.

First published:

Tags: Hardik pandya, IPL 2021, Ishan kishan, Mumbai Indians