मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबतची मोठी बातमी! CSK मॅनेजमेंटनं केला खुलासा

IPL 2021: धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबतची मोठी बातमी! CSK मॅनेजमेंटनं केला खुलासा

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर तो आणखी किती वर्ष आयपीएल खेळणार? अशी चर्चा सुरू असते. त्याच्या भवितव्याबाबत चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) मॅनेजमेंटनं खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 ऑक्टोबर :  महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर तो आणखी किती वर्ष आयपीएल खेळणार? अशी चर्चा सुरू असते. धोनीची बॅट या आयपीएलमध्ये शांत आहे. त्यामुळे तो या सिझननंतर रिटायर होईल अशी चर्चा होती. त्यावर आपल्याला शेवटची मॅच चेन्नईत खेळायची आहे, असं धोनीनं एक दिवसापूर्वीच म्हंटलं होतं. धोनीच्या या वक्तव्यानंतर तो आणखी किती खेळणार? पुढच्यावर्षी निवृत्त होणार का? याचा खुलासा चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) मॅनेजमेंटनं केला आहे.

चेन्नई सुपर किंग्सची मालकी हक्क असलेल्या इंडिया सिमेंट्सच्या अधिकाऱ्यानं क्रिकबझला सांगितलं की, 'आम्ही महेंद्रसिंह धोनीला आयपीएल 2022 साठी रिटेन करणार आहोत. तो पुढच्या वर्षी आणि कदाचित आणखी काही वर्ष तिथं असेल. याबाबत अजून काहीही निश्चित झालेलं नाही. धोनीचे फॅन्स त्याची शेवटची मॅच चेन्नईत पाहतील. याचा अर्थ त्याचं पुढचं वर्ष शेवटचं असेल,असा होत नाही.

एमएस धोनीने इंडिया सिमेंट्सला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांशी संवाद साधला तेव्हा त्याने निवृत्तीवर भाष्य केलं. 'जेव्हा अलविदा करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि मला सीएसकेकडून खेळताना बघू शकता. तुम्हाला मला अलविदा करण्याची संधी मिळेल. आम्ही चेन्नईमध्ये येऊ आणि अखेरची मॅच खेळू, अशी अपेक्षा आहे. सगळ्या चाहत्यांनाही भेटू,' असं भावुक वक्तव्य धोनीने केलं.

IPL 2021: 'धोनी 'या' खेळाडूचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्याची सूचना करणार'

2019 नंतर धोनी चेन्नईत खेळू शकलेला नाही. मागच्या मोसमात आयपीएलच्या सगळ्या मॅच युएईमध्ये झाल्या होत्या, तर या मोसमाचे पहिले 29 सामने भारतात झाले, पण कोणत्याच टीमला त्यांच्या घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळाली नाही. एमएस धोनीने आपल्या कॅप्टन्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्सला 5 टी-20 ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत, यात 3 आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफीचा समावेश आहे.

Captain Cool धोनीसाठी 'ही' गोष्ट आहे अतिशय कठीण, स्वतःच केला खुलासा

सीएसकेचा मुख्य चेहरा असलेल्या धोनीची या आयपीएलमधील कामगिरी साधारण झाली आहे. त्यानं 13 मॅचमध्ये 14 च्या सरासरीनं फक्त 84 रन काढले आहेत.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni