मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

RCB vs SRH, Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं नशीब

RCB vs SRH, Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं नशीब

 आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या टीम आमने-सामने असतील.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 ऑक्टोबर : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या टीम आमने-सामने असतील. अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये ही मॅच होईल. आरसीबीनं आत्तापर्यमत 12 मॅचमध्ये 8 विजय मिळवले आहेत. 16 पॉईंट्ससह आरसीबीची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, सनरायझर्स हैदराबादनं 12 पैकी फक्त 2 मॅच जिंकल्या असून ही टीम शेवटच्या क्रमांकावर आहे.

आयपीएल स्पर्धेत हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात आत्तापर्यंत 20 लढती झाल्या आहेत. यामध्ये 10 वेळा हैदराबादनं तर 8 वेळा बंगळुरूनं विजय मिळवलाय. तर एका मॅचचा निकाल लागला नाही. सनरायझर्सवर विजय मिळवून शुक्रवारी दिल्ली विरुद्ध होणाऱ्या मॅचसाठी मनोबल उंचावण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल. आरसीबीनं उर्वरित दोन्ही मॅच जिंकल्या तर त्यांचे 20 पॉईंट्स होतील आणि त्यांना टॉप 2 मध्ये जाण्याची संधी असेल.

सनरायझर्स टीमला आता गमावण्यासाखं काहीच नाही. त्यामुळे स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी उर्वरित मॅच जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सनरायझर्सच्या मिडल ऑर्डरनं या स्पर्धेत सपशेल निराशा केली आहे. आता बंगळुरु विरुद्ध तरी त्यांनी चांगला खेळ खेळावा अशी विल्यमसनची अपेक्षा असेल.

IPL 2021: विराटमुळे वाढलं धोनीचं टेन्शन! 3 दिवस ठरणार निर्णायक

RCB vs SRH Dream 11

कॅप्टन - विराट कोहली

व्हाईस कॅप्टन - ग्लेन मॅक्सवेल

बॅटर - देवदत्त पडिक्कल, केन विल्यमसन, जेसन रॉय

ऑल राऊंडर्स - शाहबाज अहमद

बॉलर - युजवेंद्र चहल, राशिद खान,  हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज

SCHEDULE TIME TABLE:

संभाव्य टीम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅन ख्रिस्टीन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन/हसरंगा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज

सनरायझर्स हैदराबाद : वृद्धीमान साहा, जेसन रॉय, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार  सिद्धार्थ कौल आणि उमरान मलिक

First published:

Tags: IPL 2021, RCB, SRH