क्रिकेटमध्ये पुन्हा झाली छेडछाड, ICCनं क्रिकेटपटूवर केली बॅनची कारवाई

क्रिकेटमध्ये पुन्हा झाली छेडछाड, ICCनं क्रिकेटपटूवर केली बॅनची कारवाई

एकेकाळी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूवर कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

लखनऊ, 13 नोव्हेंबर : जेंटलमन गेम म्हणून ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये चेंडू छेडछाड आणि मॅच फिक्सिंगचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतात घडलेल्या एका प्रकरणामुळे एका खेळाडूवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर आता आणखी एक खेळाडूवर चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

विंडीजचा युवा फलंदाज निकोलस पूरन याचा चेंडूशी छेडछाड करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. या व्हिडिओ पाहिल्यावर निकोलस चेंडूशी छेडछाड करत आहे की काय असा संशय येतो. यामध्ये निकोलस चेंडू पायावर घासताना त्याला नखांनी स्क्रॅच करताना दिसत आहे. हा व्हिडिओ लखनऊमधील अकाना स्टेडियमवरचा आहे. या ठिकाणी अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना सुरू होता. दरम्यान आता निकोलसने चेंडूशी छेडछाड केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळं निकोलसवर आता कारवाई करण्यात येणार आहे.

वाचा-धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, या 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू

वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलसवर आयसीसीच्या वतीनं बंदीची कारवाई केली जाणार आहे. अफगाणिस्तान विरोधात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा प्रकार घडला. आयसीसीनं चेंडूचा आकार बदलल्याचा आरोप निकोलसवर केला आहे. त्यामुळं निकोलसवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चार सामन्यांवर बंदी लावली आहे.

वाचा-बॅट, पॅड, पॅड आणि स्टम्प! पाहा क्रिकेटमधल्या अफलातून चेंडूचा VIDEO

आयसीसीच्या आचार संहिताचा (ICC Code of Conduct) लेव्हल 3चे उल्लंघन केले आहे. आयसीसीचा नियम 2.14ने उल्लंघन केल्या प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात ली आहे. त्यामुळं निकोलस आता तीन टी-20 आणि एक कसोटी सामना खेळू शकणार नाही आहे.

निकोलसवर कारवाई करण्यात आल्यामुळे वेस्ट इंडिज संघाला मोठा फटका बसला आहे. निकोलस हा सध्याच्या संघातील फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे. त्याची एकदिवसीय सरासरी 44.58 इतकी असून 14 डावात एक शतक आणि 3 अर्धशतकं केली आहेत. टी20 मध्येही तो फटकेबाजीसाठी ओळखला जातो.

वाचा-'ती' हॅट्रिक नव्हतीच, BCCI आणि ICCनं केली माती!

लखनऊमध्ये सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विंडीजने अफगाणिस्तानला क्लीन स्विप केलं. तिसऱ्या टी20 मध्ये विंडिजसमोर 250 धावांचे आव्हान होते ते त्यांनी 48.4 षटकांत पूर्ण केलं. विंडीजच्या विजयाचा शिल्पकार शाय होप ठरला. त्याने नाबाद 109 धावांची खेळी केली. तर पदार्पण करणाऱ्या ब्रॅडन किंगनं 39 धावा केल्या. त्यानतंर रॉस्टन चेजने नाबाद 42 तर पोलार्डने 32 धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या