IPL 2020 : धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, 'या' 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू

IPL 2020 : धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, 'या' 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू

आयपीएल 2020साठी चेन्नई सुपरकिंग्जचा नवा प्लॅन. या खेळाडूंना देणार डच्चू.

  • Share this:

चेन्नई, 13 नोव्हेंबर : आयपीएलच्य तेराव्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. याआधी 16 डिसेंबर रोजी IPL 2020साठी लिलाव होणार आहे. त्याआधी तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघानं (Chennai Super Kings) आपल्या स्टार खेलाडूंना रिलीज केले आहे.

माय खेल या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघानं केदार जाधव (Kedar Jadhav), अंबाती रायडू (Ambati Rayudu) आणि मुरली विजय (Murli Vijay) यांच्यासमवेत काही प्रमुख खेळाडूंना रिलीज केले आहे. 2018पासून चेन्नई सुपरकिंग्ज संघासोबत अंबाती रायडू आणि केदार जाधव यांना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मुरली विजयलाही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी आयपीएल 2019मध्ये मुरली विजयला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शेन वॉटसन आणि फाफ ड्युप्लेसिस यांना सलामीला फलंदाजी देण्यात आली होती. दुसरीकडे अंबाती रायडू आणि केदार जाधव यांना लिलाव पूलमध्ये सामिल करण्यात आले आहे. त्यामुळं त्यांना लिलावात स्वस्तात खरेदी करता येईल.

वाचा-बॅट, पॅड, पॅड आणि स्टम्प! पाहा क्रिकेटमधल्या अफलातून चेंडूचा VIDEO

आयपीएलच्या लिलावासाठी ऑफ सीझन ट्रेड विंडो ही 14 नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळं कोणत्या खेळाडूंना ठेवणार किंवा रिलीज करता येणार यासाठी एका दिवसाचा कालावधी उरला आहे. चेन्नई संघानं या तीन खेळाडूंव्यतिरिक्त फिरकी गोलंदाज करण शर्मा आणि जलद गोलंदाज शार्दुल ठाकुर यांनाही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात शार्दुल ठाकूर सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. 2019मध्ये त्याला जास्त संधी दिल्या नव्हत्या.

वाचा-'ती' हॅट्रिक नव्हतीच, BCCI आणि ICCनं केली माती!

करण शर्माला 2018मध्ये पाच कोटींना विकत घेतले होते. तर, शार्दुल ठाकूरला 2 कोटींना. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघा तीन वेळा चॅम्पियन बनली आहे. तर, गेल्या हंगामातही मुंबई इंडियन्स विरोधात चेन्नई अंतिम फेरीत पोहचला होता.

वाचा-‘तेव्हा वाटलं माझं आयुष्यच संपलं’, कॅप्टन कोहलीनं सांगितला करिअरमधला कटू प्रसंग

आयपीएलच्या लिलावात संघाकडे आहेत इतके पैसे

दिल्ली कॅपिटल्स – 7.7 कोटी

राजस्थान रॉयल्स – 7.15 कोटी रुपये

कोलकाता नाइट राइडर्स – 6.05 कोटी रुपये

सनराइजर्स हैदराबाद – 5.30 कोटी रुपये

किंग्स इलेवन पंजाब – 3.7 कोटी रुपये

मुंबई इंडियन्स – 3.55 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्स – 3.2 कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 1.80 कोटी रुपये

Published by: Priyanka Gawde
First published: November 13, 2019, 7:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading