सिडनी, 13 नोव्हेंबर : क्रिकेट जगतात दररोज वेगवेगळे प्रसंग घडत असतात. काही प्रसंगांमध्ये फलंदाज जबरदस्त कामगिरी करतात तर काही वेळा गोलंदाज आपल्या एका चेंडूनं मॅच फिरवतात. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं आपल्या एका चेंडूनं अशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा आणि ब्रेट लीनं निवृत्ती घेतल्यानंतर मिचेल स्टार्कनं (Mitchell Starc) ही जागा घेतली.
मिचेलनं इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2019मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. स्टार्कनं या स्पर्धेत 27 विकेट घेतल्या होत्या. 26 धावा देत 5 विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा स्टार्क सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही अशीच कामगिरी करत आहे. सध्या स्टार्क शेफील्ड शील्ड ट्रॉफीमध्ये न्यू साऊथ वेल्स संघाकडून खेळतो.
न्यू साऊथ वेल्स संघाकडून खेळताना मिचेलनं एक मिस्ट्री चेंडू टाकला. या चेंडूनंतर फलंदाज बाद झाला की नाही हे फक्त विकेटकीपरला कळले. हा रहस्यमय चेंडू पाहून तुम्हीही हैराण व्हाल. स्टार्कच्या या रहस्यमय चेंडूचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिचेलनं वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज जोश फिलिपला आपल्या मिस्ट्री चेंडूनं बाद केले.
वाचा-'ती' हॅट्रिक नव्हतीच, BCCI आणि ICCनं केली माती!
Bat
Pad
Pad
Stumps
What kind of sorcery is this, Mitchell Starc?pic.twitter.com/Trd5Lo7anC
— ICC (@ICC) November 12, 2019
वाचा-‘तेव्हा वाटलं माझं आयुष्यच संपलं’, कॅप्टन कोहलीनं सांगितला करिअरमधला कटू प्रसंग
काय होता मिस्ट्री चेंडू
मिचेल स्टार्कनं जोश यांना टाकलेला हा चेंडू फिलीपच्या बॅटला लागला, त्यानंतर दोन्ही पॅडवर चेंडू लागला त्यानंतर विकेटवर लागत बेल्स खाली पडले. ही विकेट फक्त विकेटकीपरलाच कळली. त्यानंतर पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले, तेव्हा फिलीप रागात मैदानाबाहेर गेला. त्याला विश्वासच बसला नाही की आपण कसे आऊट झालो.
वाचा-4 दिवस, 3 गोलंदाज आणि 4 हॅट्रिक! एका क्लिकवर पाहा क्रिकेटमधले हे सुवर्णक्षण
जगातला सर्वोत्कृष्ठ गोलंदाज आहे मिचेल
29 वर्षांच्या मिचेल स्टार्कनं 85 एकदिवसीय सामन्यात 172 विकेट घेतल्या आहेत. तर, स्टार्कनं 7 वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच विकेट घेतल्या आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 28.3च्या सरासरीनं गोलंदाजी केली आहे. एकदिवसीय क्रिकटेमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्क आठव्या क्रमांकावर आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये मिचेल महत्त्वाचा गोलंदाज आहे.