नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं हॅट्रिक घेत विक्रमी कामगिरी केली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एका चाहरनं सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी केली. त्यामुळं सर्वच स्थरातून दीपक चाहरचे कौतुक होत आहे. बांगालदेश विरोधात चाहरनं 6 तर विदर्भाविरोधात मुश्ताक अलीमध्ये 4 विकेट घेतल्या. त्यामुळं 72 तासांच्या आत दोन हॅट्रिक घेणारा चाहर चर्चेत आला होता.
सैयद मुश्ताक अलीमध्ये राजस्थानकडून खेळताना या गोलंदाजानं शेवटच्या तीन चेंडूवर तीन विकेट घेतल्या. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वजण त्यानं हॅट्रिक घेतली असा कांगावा करत असताना ही बीसीसीआयची चूक असल्याचे आता समोर आले आहे. खरतर ज्या शेवटच्या तीन चेंडूवर चाहरनं विकेट घेतल्या, त्यापैकी चौथा चेंडू हा व्हाइड होता. त्यानंतरच्या दोन चेंडूवर त्यानं दोन विकेट घेतल्या. मात्र दोन विकेटच्यामध्ये व्हाइड चेंडूमुळं चाहरची हॅट्रिक चुकली. या सामन्यात चाहरनं तीन ओव्हरमध्ये 18 धावा देत 4 विकेट घेतल्या.
वाचा-‘तेव्हा वाटलं माझं आयुष्यच संपलं’, कॅप्टन कोहलीनं सांगितला करिअरमधला कटू प्रसंग
दरम्यान, नियमानुसार जर तीन चेंडूवर तीन विकेट घेतली तर त्याला हॅट्रिक मानली जाते. मात्र चाहरनं एक चेंडू व्हाइड टाकल्यामुळं त्याची हॅट्रिक हुकली. शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर चहरनं दर्शन नालकंडेची विकेट घेतली. त्यानंतर त्यानं व्हाइड चेंडू टाकला. त्याआधी त्यानं अक्षय वाडकर आणि ऋषभ राठोड यांना बाद केले होते.
वाचा-मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...! भारताच्या क्रिकेटपटूचा दावा
वाचा-विराट, रोहितसह टीम इंडियाच्या खेळाडूंनाही लागणार ‘नाइट शिफ्ट’!
व्हाइड चेंडूवरही घेतली जाऊ शकते हॅट्रिक
नियमानुसार गोलंदाजांना व्हाइड चेंडूवरही हॅट्रिक घेता येता. मात्र जेव्हा फक्त स्टम्प आऊट आणि हिट विकेटनेच हॅट्रिक मिळते. तसेच, जर सलग तीन वेळा व्हाइड गेला असेल तर हॅट्रिकचा दावा केला जाऊ शकतो. त्यानंतरही जर विकेट घेता आली नाही तर हॅट्रिकची संधी जाऊ शकते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा