मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /''आम्हाला KL Rahul ला रिटेन करायचे होते, पण....पंजाब संघाच्या सहमालकाचा मोठा खुलासा

''आम्हाला KL Rahul ला रिटेन करायचे होते, पण....पंजाब संघाच्या सहमालकाचा मोठा खुलासा

KL Rahul

KL Rahul

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL2022) च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने त्यांचा कर्णधार केएल राहुलला (KL Rahul)रिलीज केले आहे. खरतंर संघातून बाहेर पडण्याचा निर्णय हा त्याचा स्वतःचा होता. मात्र, त्याच्या या निर्णयावर पंजाब किंग्सने (Punjab Kings) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 2 वर्षाच्या सीजनमध्ये पूर्ण स्वातंत्र्य देऊन सुद्धा केएल राहुलने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, जर नवीन संघांनी त्याच्याशी संपर्क साधला असेल तर ते बीसीसीआयच्या (BCCI)मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. असेही पंजाब किंग्सने यावेळी म्हटले आहे.

2020 हंगामाच्या सुरुवातीला आर अश्विनच्या जागी राहुलला कर्णधार बनवण्यात आले होते. त्याने फलंदाजीत चांगली कामगिरी केली, पण संघाला प्लेऑफमध्ये नेऊ शकला नाही. मिळालेल्या माहीतीनुसार तो लखनऊ संघात सामील होणार आहे.

यासंदर्भात पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया (Ness Wadia) यांनी भाष्य केले आहे. “आम्हाला राहुल संघात हवा होता, पण त्याला पुन्हा लिलावात जायचे आहे. जर इतर संघांनी त्याच्याशी आधी संपर्क साधला असेल तर ते चुकीचे आहे.” राहुलला लखनौमध्ये सामील होण्याची ऑफर दिली जाऊ शकते. पण मला आशा आहे की तसे होणार नाही. कारण ते बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल.'' असे मत वाडिया यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच वाडिया यांच्यापूर्वी अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी राहुलला टीममध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पण, त्याची थांबण्याची इच्छा नव्हती, असा खुलासा केला होता.

अनिल कुंबळे यांनी पंजाबच्या मॅनेजमेंटची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता राहुलनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'तो प्रवास सुंदर होता. तुमच्या प्रेमासाठी आभार. आता दुसऱ्या बाजूला भेटू' असं ट्विट राहुलनं पंजाबची जर्सी घातलेल्या फोटोसह केले आहे.

के. एल. राहुल (पंजाब), श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन (तिघेही दिल्ली), भुवनेश्वर कुमार (हैदराबाद) आदी भारतीय खेळाडूंसह रशीद खान, डेव्हिड वॉर्नर (दोघेही हैदराबाद), फॅफ डय़ूप्लेसिस (चेन्नई) यांसारख्या परदेशी खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (IPL2022) 15 व्या हंगामापूर्वी रिलीज केले आहे.

2010 मध्ये, रवींद्र जडेजाला एक वर्षाच्या निलंबनाचा सामना करावा लागला होता, जो राजस्थान रॉयल्सने सोडण्यापूर्वीच इतर संघांशी बोलणी करत होता. लखनौ आणि अहमदाबाद या नवीन संघांना मंगळवारी जाहीर झालेल्या खेळाडूंमधून 3 खेळाडूंची निवड करण्यासाठी 25 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. केएल राहुलशिवाय अश्विन, हार्दिक पांड्या, राशिद खान आणि युझवेंद्र चहल यांचाही यात समावेश आहे.

मोहम्मद शमीबाबत नेस वाडिया म्हणाला की तो चांगला खेळाडू आहे. ते उपलब्ध असल्यास, आम्ही त्यांना संघात समाविष्ट करू.

पुढील लिलावापूर्वी आर अश्विनला परत घेण्यास पंजाब उत्सुक आहे. यासोबतच वाडिया यांनी मोहम्मद शमीचे कौतुक करत तो उपलब्ध असल्यास, आम्ही त्याला संघात समाविष्ट करू अशी इच्छा व्यक्त केली आहे. पंजाबने केवळ मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांनाच कायम ठेवले असून त्यांच्याकडे ७२ कोटी रुपये आहेत. 8 संघांनी एकूण 27 खेळाडूंना कायम ठेवले आहे.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Kl rahul, Punjab kings