नवी दिल्ली, 13 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्व मालिकांचं शूटिंग रद्द करण्यात झाले आहे. अशा परिस्थितीत दूरदर्शनने रामानंद सागर कृत ‘रामायण’ ही मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला ही मालिका देशात सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका आहे. एवढेच नाही तर भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या फलंदाजीची प्रेरणा रामायणातून घेतली असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर नेहमीच मजेशीर ट्वीट करिता प्रसिद्ध असलेल्या सेहवागने आपल्या फलंदाजीचे श्रेय रामायणातील अंगदला दिले आहे. सेहवागने रविवारी रात्री रामायणातील एक फोटो शेअर केला. यात त्यानं मी या प्रसंगातून बॅटिंगची प्रेरणा घेतली असल्याचे कॅप्शन दिले. यानंतर चाहते बुचकळ्यात पडले. वाचा- अभिमानास्पद! भारतातील प्रसिद्ध फूटबॉलपटू करतोय COVID-19 हेल्पलाइन सेंटरमध्ये काम सेहवागने पोस्ट केलेला फोटो हा रावणाच्या दरबारातील आहे. जेव्हा दरबारातील प्रत्येकजण अंगदचा पाय हटवण्याचा प्रयत्न करतो पण कोणीही यशस्वी झाले नाही. युद्धाच्या अगोदर शेवटच्या वेळेस रामाचा संदेशवाहक बनून अंगद रावणास समजवण्यास गेला होता, मात्र रागावलेल्या रावणाने हा संदेश धुकडावून लावला. यातील अंगदचा पाय हटवण्याचा रावणाचा फोटो सेहवागने पोस्ट केला.
वाचा- ‘धोनी आता टीम इंडियात खेळणार नाही, निरोपाच्या सामन्याशिवाय क्रिकेटला करणार बायबाय’ सेहवागनं या दृश्याचे फोटो अपलोड करत, ‘मी माझ्या फलंदाजीची प्रेरणा येथून घेतली आहे. पाय हलवणे कठिण नाही, अशक्य आहे. अंगद जी रॉक्स!’ याचं कारण म्हणजे सेहवागच्या फूटवर्कविषयी बरीच चर्चा असायची. पण या सलामीवीरने त्याची कधीच पर्वा केली नाही आणि आपल्या आक्रमक शैलीने जगतील सर्व गोलंदाजांची धुलाई केली. वाचा- लॉकडाऊनमुळे क्रिकेटला मिस करताय? मग हे फोटो एकदा पाहाच
#RahulDravid Sir also got inspiration from #Angad ji.
— Subodh Agarwal🏏 (@SubodhAgarwal1) April 12, 2020
Jam Gaye Crease pe.. #TheWall. 😋😁
सेहवागने हा फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी द्रविडनेही अंगदकडून प्रेरणा घेतली असल्याचे मत व्यक्त केले.