'धोनी आता टीम इंडियात खेळणार नाही, निरोपाच्या सामन्याशिवाय क्रिकेटला करणार बायबाय'

'धोनी आता टीम इंडियात खेळणार नाही, निरोपाच्या सामन्याशिवाय क्रिकेटला करणार बायबाय'

आयपीएल पुढे गेल्यामुळे आता धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 एप्रिल : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपनंतर एकदाही क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही. वर्ल्ड कपनंतरच धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र धोनीचं भारतीय संघात पुनरागमन होईल पण ते आयपीएलमध्ये त्याच्या कामगिरीवर ठरेल असंही सांगण्यात येत होतं. पण आता कोरोना व्हायरसमुळे 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेलं आयपीएल यावर्षी होईल की नाही याची शंका आहे.

आयपीएल पुढे गेल्यामुळे आता धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. याआधी बीसीसीआय़ने त्याला वार्षिक करारातून बाहेर ठेवलं होतं. तर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्यांदाच म्हटलं आहे की, धोनीचं कमबॅक आयपीएलवर ठरणार आहे.

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने म्हटलं की, धोनी आता टीम इंडियाची जर्सी घालू शकणार नाही. रमीज राजासोबत युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्राने हे वक्तव्य केलं. धोनी बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे आणि याचाच अर्थ त्यानं क्रिकेट करिअरचा विचार केला आहे.

हे वाचा : लॉकडाऊनमुळे क्रिकेटला मिस करताय? मग हे फोटो एकदा पाहाच

आकाश चोपडा म्हणाला की, धोनीने आतापर्यंत त्याच्या भविष्याबद्दल कोणालाही काही सांगितलेलं नाही. पण असं वाटतं की धोनीने भारताकडून 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना खेळला आहे. त्याला बाहेर करण्यात आलं नाही तर तो स्वत: बाहेर राहिला. आता तो भारतासाठी खेळू शकणार नाही. तसंच जोपर्यंत सौरव गांगुली, विराट कोहली किंवा रवि शास्त्री बोलत नाहीत तोपर्यंत धोनी वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणार नाही. बहुतेक धोनीनेही आता मान्य केलं असावं की क्रिकेटला रामराम कऱण्याआधी निरोपाचा सामना खेळण्याची गरज नाही.

हे वाचा : मॅक्सवेलच्या भारतीय गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर सांगितली लव्ह स्टोरी

First published: April 12, 2020, 4:19 PM IST
Tags: MS Dhoni

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading