टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटूसाठी कोरोना म्हणजे 'वरदान', वाचवणार करिअर

टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटूसाठी कोरोना म्हणजे 'वरदान', वाचवणार करिअर

एकीकडे या खतरनाक व्हायरसने सर्वांना हैराण केले असताना भारतीय गोलंदाजासाठी हाच कोरोना वरदान ठरत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे केवळ भारतातच नव्हे तर सर्व देशांमध्ये क्रिकेटवर बंदी आहे. यामुळे आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं सर्व खेळाडू सध्या सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत. एकीकडे या खतरनाक व्हायरसने सर्वांना हैराण केले असताना भारतीय गोलंदाजासाठी हाच कोरोना वरदान ठरत आहे.

दुखापतीमुळे बर्‍याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी कोरोना सध्या वरदान ठरत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात चाहरला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघाच जागा मिळाली नाही.

वाचा-IPL रद्द झाल्यास विराटसह 'या' 5 खेळाडूंना बसणार कोट्यवधींचा फटका

एनसीएमधून घरी परतला

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चाहर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला फिट होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले आहे. कोरोनामुळे एनसीए बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चाहर घरी परतला. दरम्यान आता आयपीएलचा हंगाम येत असल्यामुळे चाहरला फिट होण्यासाठी बराच कालावधी मिळू शकतो. त्यामुळे कोरोना हे खरतर या गोलंदाजासाठी वरदान ठरत आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना चहरने, कोरोनामुळे आता तंदुरुस्त होण्यासाठी आणखी कालावधी मिळाला असल्याचे सांगितले.

वाचा-क्रिकेटविश्वात घुसला व्हायरस, भारताविरुद्ध खेळलेल्या 'या' गोलंदाजाला कोरोना

कोरोनामुळे फिट होण्यासाठी मिळणार जास्त वेळ

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा चाहर म्हणाला, "आमची आग्रा येथील क्रिकेट अकादमी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मी घरीच सराव करत आहे". तसेच, त्याने जिम बंद असल्यामुळे चाहरने दोन दिवसांपूर्वी घरीच सामान मागवले. त्यामुळं आयपीएलवरची स्थगिती माझ्यासाठी वरदान ठरत आहे, असेही चाहर म्हणाला. कोरोनामुळे 29 मार्चपासून सुरू होणारा आयपीएलचा हंगाम आता 15 एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. मात्र कोरोनाचा धोका वाढल्य़ास हा हंगाम रद्दही केला जाऊ शकतो.

First published: March 22, 2020, 1:00 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या